Rohit Pawar PC : अजितदादांचा अपघात की घातपात; आज 4 वाजता होणार मोठा खुलासा?

Rohit Pawar PC  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाल्याने पवार कुटुंबासह

Rohit Pawar PC

Rohit Pawar PC

Rohit Pawar PC  : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी बारामती येथे एका विमान अपघातात निधन झाल्याने पवार कुटुंबासह महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. अजितदादांच्या निधनाने संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाला आहे. या अपघातात अजितदादांसह 4 जणांचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या निधननांतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. तर राष्ट्रवाादी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून हा अपघात नसून हत्या असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात सत्य काय? याबाबत खुलासा करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे आता या प्रकरणात पवार कुटुंबातील सदस्य आणि कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार भाष्य करणार आहे. आज संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेत रोहित पवार (Rohit Pawar) या प्रकरणावर भाष्य करणार आहे. आज (मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी) सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई (Mumbai) या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी  सोशल मीडियावर दिली आहे. त्यामुळे रोहित पवार नेमकं काय बोलणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. या पोस्टमध्ये अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका असून या पत्रकार परिषदेत महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार असल्याची देखील माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

रोहित पवार यांची पोस्ट

बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी) सायंकाळी 4 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे. अजितदादांच्या निधनानंतर पहिल्यादांच पवार कुटुंब या अपघातावर भाष्य करणार असल्याने रोहित पवार पत्रकार परिषदेत काय बोलणार याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. दादांच्या निधानंतर अनेक जणांनी या अपघातावर संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली होती मात्र पवार कुटुंब अजितदादांच्या निधनाच्या 13 दिवसानंतर बोलणार असल्याची भूमिका पवार कुटुंबाकडून घेण्यात आली होती.

CCTV फुटेज प्रसारित करा – अमोल मिटकरी

तर दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघाताची CCTV फुटेज प्रसारित करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, आदरणीय दादांच्या विमान अपघाताचा थातुर मातुर चौकशी अहवाल यायला सुरुवात झाली आहे.दादा इतकी सामान्य व्यक्ती नव्हती,अहवाल सांगेल तांत्रिक चुक होती व वैमानिकाचा अंदाज चुकला,व जनता मान्य करेल! महाराष्ट्र पुरावा मागतोय DGCA नी विमानतळावरील CCTV फुटेज प्रसारित करून दादाच्या आगमनापासून विमानात बसेपर्यंत प्रत्यक्षदर्शी पुरावा सादर करावा.

अजितदादांच्या वारशावरून राष्ट्रवादीत यादवी?-

Exit mobile version