Download App

‘तो माझा जीव घेणार होता, मी फक्त…’; शिंदे-फडणवीसांचं नाव घेताच गायकवाडांचा मुलाखतीतून काढता पाय

MLA Sanjay Gaikwad Hits Canteen Employee : मुंबईतील आमदार निवासातील शिळ्या दाळीचं प्रकरण अजून ताजचं आहे. कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप शिंदे गटाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्यावर आहे. शिंदे-फडणवीसांचं (Eknath Shinde) नाव घेताच गायकवाडांनी मुलाखतीतून पाय काढता घेतल्याचं समोर (Sanjay Gaikwad Hits Canteen Employee) आलंय. ते एनडीटीव्हीला मुलाखत देत होते. निवेदकाने प्रश्न विचारला की, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तुमचे कान टोचले आहेत, तुमच्यावर टीका केलीय. हे ऐकताच आमदार संजय गायकवाड संतापले अन् ते थेट मुलाखत सोडून निघून गेल्याचं समोर आलंय.

नागपुरात 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांचा कारनामा, चविष्ट जेवणासाठी सायकली चोरायचे, पोलिसांनी घेतले ताब्यात..

मला उलट्या झाल्या आणि…

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे त्यांच्या कृत्यामुळे खूप अडचणीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षांनीही त्यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. कर्मचाऱ्यावरील हल्ल्याच्या प्रकरणात स्पष्टीकरण देताना गायकवाड म्हणाले की, मी डाळ-भात आणि दोन चपाती असं साधं जेवण मागवलं होतं. मी पहिला घास खाल्ला तेव्हा, त्याची चव खराब होती. दुसरा घास खाल्ल्यानंतर मला उलट्या झाल्या आणि अस्वस्थ वाटू लागले. मला डाळीचा वास आला आणि मी त्याच अवस्थेत खाली गेलो. मी विचारले की, जेवण कोणी वाढले. त्यांनी सांगितले की मी हे जेवण व्यवस्थापक आणि त्यांच्या सहा कर्मचाऱ्यांना दाखवले. मी तिथे बसलेल्या सामान्य लोकांनाही सांगितले.

SIR प्रक्रिया मनमानीची, नागरिकत्व ठरवण्याचा अधिकार EC ला नाही; कपिल सिब्बल यांचा युक्तीवाद

हात उचलल्याची कबुली

या प्रकरणात त्यांनी म्हटलंय की, जर तुम्हाला एखाद्या आमदाराच्या जीवाशी खेळायचे असेल तर मी काय करावे? मी त्याला मारण्यासाठी हल्ला केला नाही. मी त्याच्यावर पूर्ण ताकदीने हल्ला केला नाही. त्याला समजावून सांगितले पाहिजे, त्याला इशारा देण्यासाठी हात उचलल्याची कबुली त्यांनी दिली आहे. मी यासंदर्भात दोनशे तक्रारी केलेल्या आहेत. तरी देखील तोच कंत्राटादार तीन वर्षांपासून तिथे आहे. जर सरकारने किंवा अधिकाऱ्यांनी कारवाई केली असती, तर मला असा कायदा हातात घेण्याची वेळ आली नसती. जर कोणी पुन्हा अशी चूक केली, तर मी त्याला सोडणार नाही, असा इशारा पुन्हा आमदार संजय गायकवाड यांनी दिला आहे.

तो माझा जीव घेणार होता…

यावेळी बोलताना संजय गायकवाड म्हणाले की, मला माझी जबाबदारी माहित आहे. तुम्ही माझा आवाज लोकांपर्यंत का पोहोचवत नाही, माझ्या बोलण्यात व्यत्यय आणू नका. तुम्हाला फक्त एका माणसाला मारहाण होताना दिसतोय. तो माणूस जवळपास एक लाख लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचं तुम्हाला दिसत नाही का? मी केवळ त्याच्या कानशि‍लात लगावली आहे, नाहीतर तो माझा जीव घेणार होता, असं देखील संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे.

 

 

follow us