Suresh Dhas On Pankaja Munde : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात एका टोळक्याने विलास घुले या तरुणाची हत्या केल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन आता राजकारण देखील तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना या प्रकरणावरुन जोरदार हल्लाबोल करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
लेट्सअप मराठीशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, विलास घुले हे स्वतः हॉटेल चालक आहेत. हॉटेलवर आलेल्या लोकांची भांडण सोडविण्यासाठी तो गेला होता मात्र याचीच हत्या करण्यात आला आली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी आणि विलासला न्याय मिळाला पाहिजे असं लेट्सअप मराठीशी बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले.
पुढे बोलताना सुरेश धस (Suresh Dhas) म्हणाले की, विलास हा मुलगा अतिशय तरुण होता. त्याच्या हॉटेलवरती लागलेली भांडण मिटवण्यासाठी तो गेला होता मात्र त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणात 8-9 आरोपी आहे. सीसीटीव्हीमध्ये सुद्धा ते आरोपी दिसत आहे. सर्व आरोपींना पकडलं पाहिजे अशी मागणी देखील यावेळी सुरेश धस यांनी केली. विलास घुले यांच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी मी जाणार आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) त्यांच्या पद्धतीने भेटायला जाणार आणि मी माझ्या पद्धतीने भेटायला जाणार असेही यावेळी सुरेश धस म्हणाले.
रोहित शर्माला पद्मश्री, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांचे वितरण
पंकजा मुंडेंशी सध्या तरी मिटलेल नाही – सुरेश धस
तर दुसरीकडे पंकजा मुंडेंशी (Pankaja Munde) असणारा राजकीय वाद संपलं का? यावर बोलताना आमदार सुरेश धस म्हणाले की, आम्ही भाजपाच निश्चितपणे काम करतो परंतु पंकजा मुंडेंशी सध्या तरी मिटलेल नाही. इथून पुढे बघू इथून पुढे बघू नंतर काय होतो.
नेमकं प्रकरण काय?
20 जून रोजी टाकळी फाटा येथील हॉटेल गावकरीवर जुन्या प्रम प्रकरण आणि कौटुंबिक वादातून बाबासाहेब कदम व त्याच्या साथीदारांनी उमेश माने या तरुणाला मारहाण केली. या तरुणाला वाचवण्यासाठी विकास घुले गेला असता आरोपींनी रेणू बारसमोर विलास घुले यांना अडवून बेदम माराहण केली. या घटनेनंतर फरार आरोपींना अटक करा, आरोपींवर मकोको लावा या मागणीसाठी रास्ता रोको आंदोनल केले होते.
