विखे फॅक्टरमुळे अवघ्या चार दिवसांत आमदारकी! आमदार तनपुरेंकडून प्रांजळ कबुली

MLA Tanpure Vikhe factor तनपुरे यांनी एका कार्यक्रमामध्ये प्रांजळ कबुली देत आमदारकीसाठी विखेंचे जाहीर आभार मानले.

EX MP Sujay Vikhe

EX MP Sujay Vikhe

MLA Tanpure’s candid confession became an MLA in just four days due to Vikhe factor : विधानपरिषद निवडणुक जागा बिनविरोध करून दाखवत भारतीय जनता पक्षा सह महायुतीने राजकीय पातळीवर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले असून, या घडामोडीमुळे जिल्ह्यात भाजपची आणि पर्यायाने विखेंची संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. त्यामुळे तनपुरे यांनी एका कार्यक्रमामध्ये प्रांजळ कबुली देत आमदारकीसाठी विखेंचे जाहीर आभार मानले.

नेमकं काय म्हणाले प्राजक्त तनपुरे?

आपल्या झटपट कार्यशैलीबद्दल आम्ही ऐकून होतो. आजवर दूरून बघायचो मात्र एवढ्या झटपट तुम्ही मला सांगा की, शनिवारी माझा पक्षात प्रवेश झाला रविवारी उमेदवारी जाहीर झाली आणि गुरूवारी मी आमदार झालो. त्यामुळे राहुरीकरांनी तुमच्या झटपट कार्यशैलीचा अनुभव घेतला आहे. तसेच सर्वांना आवर्जून सांगू इच्छितो की, तिकीट मिळण्यापासून ते अर्ज भरण्याची प्रक्रीया असो की, अर्ज काढण्याचा दिवस असेल तुम्ही टीव्हीवर बघितलं असेल या सर्व प्रक्रियेमध्ये सर्वात सिंहाचा वाटा कुणी उचचला असेल तर तो विखे पाटील साहेबांनी उचललेला आहे हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे.

इतरांची मुलंबाळं राज्यसभा, लोकसभेवर, मलाही न्याय हवा… राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर भुजबळांची नाराजी

मी पाच वर्ष विधानसभेवर होतो. आता मी पुन्हा आलो आहे. विधानसभेत नाही पण विधान परिषदेत आलो. ही संधी आपण मला दिलेली आहे. मला खात्री आहे की, राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघ तर आहेच पण जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न विधान परिषदेमध्ये मांडण्याची संधी आपण मला दिली. या संधीच सोन केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो. असं म्हणत तनपुरे यांनी एका कार्यक्रमामध्ये प्रांजळ कबुली देत आमदारकीसाठी विखेंचे जाहीर आभार मानले.

Exit mobile version