इतरांची मुलंबाळं राज्यसभा, लोकसभेवर, मलाही न्याय हवा… राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर भुजबळांची नाराजी

NCP Chhagan Bhujbal यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

Chhagan Bhujbal On LPG Shortage

NCP Chhagan Bhujbal displeased due to Rajya Sabha nomination lost : राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ (NCP) नव्हे तर राजेंद्र जैन यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला होता. या रिक्त झालेल्या जागेवर कुणाला संधी द्यायची याबाबत राष्ट्रवादीत चर्चा होती. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं नाव निश्चित झाल्याची चर्चा होती. मात्र, आता राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यानंतर भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

नेमकं काय म्हणाले छगन भुजबळ?

भाजपचे प्रस्ताव मांडल्यानंतर शेवटचा एकच दिवस होता. त्यावर त्यांचं उत्तर आलं की, जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा आम्ही विचार करू असं अश्वासन दिलं. त्यामुळे भाजपने नकार दिला त्याला काही अर्थ नाही. जसा न्याय इतरांना मिळाला आहे. त्यांची मुलंबाळ जसे राज्यसभेवर, लोकसभेवर आणि इकडे मंत्री आहेत. तसेच मी सुद्धा हा पक्ष स्थापन करण्यापासून पवारसाहेबांबरोबर पुढाकार घेतलेला आहे. त्यामुळे मला सुद्धा हाच न्याय मिळाला पाहिजे. ही माझी मागणी होती, परंतु आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा मी कबड्डीचा खेळाडू आहे. मी बुद्धीबळाचा खेळोडू नाही. बुद्धीबळाची मला माहिती नाही. असं म्हणत भुजबळ यांनी आपल्याला राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने पक्षावर नाराजी व्यक्त केली आहे.

भुजबळांच्या अटी अमान्य ?

छगन भुजबळ हे दिल्लीला गेल्यावर येवला विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त होणार. या रिक्त जागेवर पुतण्या समीर भुजबळ यांना संधी देण्यात यावी व माझे मंत्रिपद त्यांना द्यावी, अशी भूमिका छगन भुजबळ यांनी घेतली होती. समीर भुजबळ यांना आमदारकी मिळेल असं बोललं जोत होतं. परंतु मंत्रिपद मिळण्याबाबत शंका उपस्थित केली होती. आता या मुद्द्यावर भुजबळांबरोबर तडतोड झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

“हिल पोरी हिला” गाण्याची भारताला भुरळ भारताच्या यूट्यूब मध्ये 24 व्या क्रमांकावर गाणं होतंय ट्रेंड !

माजी खासदार नवनीत राणा यांनी आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेट घेतली होती. त्यांचा फोटोही त्यांनी फेसबुकवर टाकला होता. त्यामुळे नवनीत राणा यांचे नाव जाहीर होईल, असंही बोलले जात होतं. परंतु तटकरे यांनी राणा या उमेदवार नसतील, असं जाहीर केलं होतं. राज्यसभेचा उमेदवार फायनल करण्याबाबत कोअर कमिटीची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या निवासस्थानी झाल्यानंतर होईल असं सांगितलं होतं.

follow us