Download App

भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली; नामदेव शास्त्रींनी मुंडेंची पाठराखण केल्यावर जितेंद्र आव्हाडांनी सुनावलं…

नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली दिली.

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : महाराष्ट्रात सध्या बीड (Beed) जिल्हा चांगलाच चर्चेत आहे. सकाळीच भगवान गडाचे महंत नामदेवशास्त्री (Mahant Namdevshastri) यांनी पत्रकार परिषद घेत आपण मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत, असे जाहीर केले आहे. त्यांच्या या विधानानंतर राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केलं.

आर्थिक वर्ष 2026 मध्ये विकास दर किती असणार, जाणून घ्या आर्थिक सर्वेक्षणातील अंदाज… 

डॅा.नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी, भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुण गुन्हेगारी व्रताचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे, असं आव्हाड म्हणाले.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की,
डॅा.नामदेव शास्त्री महाराज यांनी आज धंनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे समर्थन करणे अत्यंत दुर्दैवी आहे. भगवान गडासारख्या पवित्र ठिकाणावरुण अश्या गुन्हेगारी व्रताचे समर्थन आणि पाठराखण होणे, ही समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. कधीकाळी आपण भगवानगड राजकारण्यापासून मुक्त करण्याची शपथ घेतली होती? आणि आज निष्पाप लोकांचे बळी घेणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करुन त्यांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या धंनजय मुंडे, वाल्मिक कराड टोळीचे समर्थन करताय ही मनाला न पटणारी गोष्ट आहे, असं आव्हाड म्हणाले.

पुढं ते म्हणाले की, शास्त्री महाराज आपल्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण आपण धनंजय मुडे, वाल्मिक कराड टोळीची पाठराखण करणे हे भगवान बाबांच्या विचारांना तिलांजली देण्यासारखे आहे. धंनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्या गुन्हेगारी आणि राक्षसी राजकीय महत्वकांक्षेसाठी उध्वस्त केलेल्या समाजातील लोकांची यादी देतोय, त्या सर्वांना आणि धंनजय मुंडे, वाल्मिक कराड यांना भगवान गडावर समाजाची परीषद बोलावून समोरासमोर बसून चर्चा घडवून आणा, म्हणजे धंनजय मुडे, वाल्मिक कराड हे किती मोठे संत आहेत, हे संपुर्ण जगाला कळेल, असंही आव्हाड म्हणाले.

ज्यांचे खुण झालेत असे….
१) मयत संगीत डिघोळे परळी यांचे कुटुंब
२) मयत काकासाहेब गर्जे परळी यांचे कुटुंब
३) मयत महादेव मुंडे परळी यांचे कुटुंब
४) मयत बापु आंधळे परळी यांचे कुटुंब
५)मयत बंडु मुंडे परळी यांचे कुटुंब

ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले घडवून आणले आहेत असे..
१) महादेव गित्ते, परळी
२) सहदेव सातभाई, परळी
३) राजाभाऊ नेहरकर, परळी

ज्यानां खोट्या गुन्ह्यांत अडकवून त्यांचे आयुष्य उध्वस्त केले असे…
१) प्रा. शिवराज बांगर, बीड
२) बबनभाऊ गित्ते, परळी
३) रामक्रष्ण बांगर, विजयसिंह बांगर, पाटोदा
४) करूणा धंनजय मुंडे, परळी
५) प्रकाश मुंडे नाथ्रा परळी
६) राजाभाऊ फड परळी

अशी खुप मोठी समाजातील लोकांची यादी आहे. (इतर समाजाची यादी जोडल्या ती फार मोठी होईल) ज्यांना घेवुन मी आपल्याकडे येतो, यांच्या वेदना आणि त्यांना वेदना देणारा कोण आहे? हे आपण महंत म्हणून विचारणार का?, असा सवाल आव्हाड यांनी केली.

धंनंजय मुंडेच्या हाताला लावलेल्या सलाईनपेक्षा धंनजय मुंडे, वाल्मिक कराड यांच्यामुळे अनाथ झालेली लेकरे, विधवा झालेल्या बायका, आपल्या पोटच्या मुलांना गमावून सतत डोळ्यातून आसवे गाळणारे आई बाप, यांनी घडवून आणलेल्या हल्ल्याने कायम आधू झालेले लोक, यांनी खोट्या गुन्ह्यांत अडकवल्या नंतर तुरुंगात खितपत पडलेले किंवा रानोमाळ भटकंती करणारे लोक, यांचे दुःख फार मोठे आहे. महंत म्हणून आपण हे दुःख समजून घेणार आहात का?, असा थेट सवाल आव्हाड यांनी केला.

सुदर्शन घुले, प्रतीक घुले, गोट्या गित्ते , धनराज फड, सुनिल फड, विष्णु चाटे, रघु फड, यांसारखे समाजातील शेकडो तरुण स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी गुन्हेगार बनवलेत. त्यांच्या कुटुंबाची काय अवस्था आहे?

follow us