Download App

कान्होबा देवस्थानात आमदारांच्या हस्ते आरती; पोलिस बंदोबस्तात शांततेत पार पडला धार्मिक विधी

Sangram Jagtap  : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा ऊर्फ तांबुळदेव देवस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 26) कडक पोलिस

  • Written By: Last Updated:

Sangram Jagtap  : पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील कान्होबा ऊर्फ तांबुळदेव देवस्थान वादाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 26) कडक पोलिस बंदोबस्तात धार्मिक विधी शांततेत पार पडला. आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) आणि आमदार मोनिका राजळे (Monika Rajale) यांच्या हस्ते एका गटाने पूजा-अर्चा करत आरती केली. यावेळी हजारोंच्या संख्येने नात भक्तांनी उपस्थिती लावली होती. आरतीनंतर प्रसादही वाटप करण्यात आले.

सकाळी देवस्थानच्या ठिकाणी एका गटाकडून आरतीसाठी व पूजेसाठी आणलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले. मात्र नंतर आमदार जगताप व राजळे यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन आरती केली. वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला होता. दुसऱ्या गटाला देवस्थान परिसरात येण्यास पोलिसांनी मज्जाव केला.

घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा, पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासन सतर्क होते. या वादावर तोडगा काढण्यासाठी याआधी महसूल व पोलीस प्रशासनाच्या  दोन्ही गटांशी स्वतंत्र व संयुक्त अशा तीन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.

क्रिकेटमध्ये मोठे बदल, आता एका चुकीमुळे संपूर्ण संघाला बसणार फटका, 5 धावा कमी होणार

अशा स्थितीत आज एका गटाने कान्होबा उर्फ तांबुळदेव यांची पूजा करून आरती केली. मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेत शांततेत धार्मिक विधी पार पाडल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला आहे.

आम्हाला मालक बनता येणार नाही, आमदार लोणीकरांना समज देणार; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले

follow us