संग्राम जगताप यांना कोंडीत पकडण्यासाठी खुद्द शरद पवार नगरच्या मैदानात; कट्टर कार्यकर्ता फोडला

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आज अचानक नगर शहरात येऊन गेले. अवघ्या दहा ते पंधरा मिनिटासाठी पवार हे नगर शहरात येऊन गेले मात्र याबाबत कोणालाही माहिती नव्हती. शरद पवार (Sharad Pawar) यांनी शहरातील उद्योजक अफजल शेख (Afzal Sheikh) यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) देखील उपस्थित होते. कधीकाळी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांचे चांगले कार्यकर्ते राहिलेले अफजल शेख यांची पवारांनी भेट घेतल्याने शहरात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
तसेच येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याने या भेटीला एक महत्व प्राप्त झाले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्याने राजकीय नेतेमंडळींकडून कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मार्फत पक्षबळकटीकरण व निवडणुकीची मोर्चेबांधणी देखील सुरु झाली आहे. नगर शहरामधील मुकुंदनगर येथे 11 जून रोजी शरद पवार यांनी शहरातील उद्योजक अफजल शेख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी खासदार निलेश लंके देखील उपस्थित होते.
शरद पवार यांनी अचानक अफजल शेख यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संग्राम जगताप हे मैदानात होते. पवारांच्या उमेदवाराला धोबीपछाड देत जगताप यांनी आमदारकीला गवसणी घातली. लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांना चांगले यश मिळाले. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये नगर जिल्ह्यात आघाडीचे अवघे दोन आमदार निवडून आले. यातच आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुका या आहेत. यामुळे शरद पवार नगर शहरात आता कोणता राजकीय डाव खेळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
10 जूनला निवृत्ती अन् 11 जूनला ‘या’ संघाचा कर्णधार; निकोलस पूरन पुन्हा चर्चेत
तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी शिवसेनेचा मेळावा हा मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना पाठबळ देण्यात आले तसेच तयारी करण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या होत्या. यामुळे आता राष्ट्रवादीचा शरद पवार गट देखील या निवडणुकांच्या अनुषंगाने तयारी करताना दिसून येत आहे.