10 जूनला निवृत्ती अन् 11 जूनला ‘या’ संघाचा कर्णधार; निकोलस पूरन पुन्हा चर्चेत

10 जूनला निवृत्ती अन् 11 जूनला ‘या’ संघाचा कर्णधार; निकोलस पूरन पुन्हा चर्चेत

Nicholas Pooran : वेस्ट इंडिजचा स्फोटक आणि स्टार फलंदाज निकोलस पूरनने (Nicholas Pooran) सर्वांना धक्का देत 10 जून रोजी आतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने वयाच्या 29 व्या वर्षी निवृत्ती जाहीर केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. तर आता आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे. निवृत्ती जाहीर केल्यानंतर पूरनला मेजर लीग क्रिकेटच्या (Major League Cricket) आगामी हंगामासाठी एमआय न्यू यॉर्क संघाने कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे.  2023 मध्ये पूरनने या लीगमध्ये शानदार कामगिरी करत 388 धावा केल्या होत्या.

तर आता या हंगामात तो एमआय न्यू यॉर्क संघाचा कर्णधार असणार आहे. आतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पूरनने अगदी कमी वेळेत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्याच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा केली होती.

तर दुसरीकडे तो मेजर क्रिकेट लीगमध्ये गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डची जागा घेणार आहे.  फ्रँचायझीने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, ‘आमचा हिरो, आमचा कर्णधार! निकोलस पूरन – 29 वर्षीय पॉकेट डायनामाइट, उर्फ MINY सुपरस्टार, याला मेजर लीग क्रिकेटच्या 2025 हंगामापूर्वी MI न्यू यॉर्कचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.’

Maharashtra Politics : नितेश राणे यांनी महायुतीमधील मित्र पक्षांवरच केलेल्या वक्तव्याचे पडसाद उमटले

मेजर क्रिकेट लीगमध्ये एमआय न्यू यॉर्क संघ 13 जून रोजी ऑकलंड कोलिझियम येथे टेक्सास सुपर किंग्जविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.  निकोलस पूरनने 61 टी-20 आंतरराष्ट्रीय आणि 106 एकदिवसीय सामने खेळल्यानंतर आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप दिला. दोन्ही फॉरमॅटमध्ये त्याने 4000 हून अधिक धावा केल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube