Download App

टोलनाका फोडणाऱ्यांचं अमित ठाकरेंकडून अभिनंदन; म्हणाले, इथून पुढे…

Amit Thackeray  Samrudhi Highway :  नाशिकजवळी सिन्नर येथील टोल नाका तोडफोडीनंतर मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) भाजपच्या निशाण्यावर आले आहेत. हे सरकार जनसामांन्यांचं सरकार आहे. इथे कोणा एका नेत्याच्या मुलासाठी वेगळे नियम नसतील. अमित ठाकरे टोल नाका फोडणे म्हणजे राजकारण नाही. कधीतरी बांधायलाही शिका आणि शिकवा, अशा शब्दात भाजने अमित ठाकरेंना सुनावले होते.

तसेच या घटनेनंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. परंतु आता त्यांना जामीन मिळाला आहे. या कार्यकर्त्यांना जामीन मिळताच अमित ठाकरे यांनी नाशिकला जाऊन त्यांची भेट घेतली. अमित ठाकरे यांनी टोलनाका फोडणाऱ्यांचं अभिनंदन केलं. यावेळी त्यांनी या सर्व प्रकरणावर भाष्य केले आहे.

सोमय्यांचा पाय खोलात! तो व्हायरल व्हिडिओ खरा, गुन्हे शाखेच्या सूत्रांची माहिती

अमित ठाकरे यांनी हा टोलनाका फोडणाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, प्रत्येकाने टोलानाका फोडावा असं माझं म्हणणं नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की, व्यवस्थेला एक मेसेज देणं गरजेचं आहे. टोलनाक्यावर सामान्य नागरिकांची हेळसांड होते. हे लोक ज्या प्रकारे बाऊन्सर्स ठेवून टोल नाक्यावर वसुली करतात. माझा विचार सोडून द्या, या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांचा विचार करा. मी इथे आल्यावर तेच केलं. सामान्य नागरिकांना काय त्रास होत असेल याचा विचार केला.

https://letsupp.com/pune/pune-crime-news-lender-rape-on-woman-in-front-her-husband-72172.html

अमित ठाकरे पुढे म्हणाले की, अनेकदा बातम्यांमध्ये पाहायला मिळतं, टोल नाक्यावरील बाऊन्सर्सने महिलांवर हात उचलाल, किंवा बाऊन्सर्स महिलांशी उद्धटपणे वागले. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. त्यांची ही दादागिरी थांबली पाहिजे. हा मेसेज जाणं गरजेचं होतं. हा मेसेज देण्यासाठी मुद्दाम तोडफोड केली नाही. पण अनायसे तसं घडलंय तर ठीक आहे.

Tags

follow us