Download App

चोर दरोडेखोरांचं महाराष्ट्रावर राज्य; मनसेचे कार्यकर्ते शिवसेना ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंकडून स्वागत

जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर

  • Written By: Last Updated:

Uddhav Thackeray : मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी मनोगत व्यक्त केलं. (Uddhav Thackeray ) मी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून उभा असेन आणि तुम्हाला सहकार्य करेन असं उद्धव ठाकरे म्हणाले. तसंच, चोर दरोडेखोरांचं राज्य महाराष्ट्रावर आलं आहे अशीही टीका उद्धव ठाकरेंनी केली.

तुमच्याच गावात जमावबंदी का केली? शरद पवारांचा मारकडवाडीतील ग्रामस्थांना सवाल

 इतिहास घडवायचा आहे

जे जिंकलेत त्यांच्याकडे जल्लोष नाही. कारण त्यांना त्यांच्या विजयावर विश्वासच बसत नाहीये. निवडणूक निकालानंतरही तुम्ही आला आहात, जिंकल्यावर सगळे येतात. ज्याला पराभवाची खंत असते तोच इतिहास घडवतो. आपल्याला इतिहास घडवायचा आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

पक्ष काढण्यासाठी हेतू लागतो

यांनी संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आहे म्हणत, एक है तो सेफ है. आता हाच प्रश्न मला मराठी माणसाला विचारायचा आहे. उद्याची मुंबई आपली राहणार आहे का? कारण असे बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यांदेखत ओरबाडून नेली जाते आहे आणि अशा वेळी आपण षंढ म्हणून हे बघत बसणार का? असा प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

तुम्ही कुठल्या पक्षातून आलात त्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण पक्ष स्थापन केल्यानंतर एक काहीतरी हेतू लागतो, दिशा लागते. ती अजिबातच त्या पक्षात (मनसे) नाही. अशावेळी तुमच्यासारखे कार्यकर्ते तिथे मरमर मेहनत करतात, त्या मेहनतीला काही अर्थ राहात नाही. आज तुम्ही सगळे शिवसेनेत आला आहात, होय शिवसेनाच कारण मी शिवसेना एकच मानतो. शिवसेना हे नाव इतर कुणालाही देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही हे मी अनेकदा उघडपणे सांगितलं आहे आजही तेच सांगतो आहे असंही ठाकरे म्हणाले आहेत.

follow us