Download App

सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्यांनी विध्वंस सुरू केला, मोहन भागवत यांचं मोठं विधान

  • Written By: Last Updated:

Mohan Bhagwat On Marxism : सांस्कृतिक मार्क्सवादाच्या (Marxism) नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विनाश सुरू केला आहे. त्यामुळं जगाला डाव्यांच्या या संकटापासून मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. दिलीपराज प्रकाशनातर्फे लेखक अभिजित जोग यांच्या जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकाचे प्रकाशन सिम्बायोसिस विश्वभवन सभागृहात झाले. त्यावेळी भागवत बोलत होते. यावेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू प्रा. डॉ. शांतीश्री पंडित, प्रकाशनाचे व्यवस्थापकीय विश्वस्त राजीव बर्वे उपस्थित होते.

 

ठाकरे गट आणि शिंदे गट आमनेसामने, ‘या’ दोन याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी 

देव तर अमर आहेत, पण सनातन नष्ट झाले तर नुकसान कोणाचे होईल, असा सवाल करत भागवत म्हणाले, सांस्कृतिक मार्क्सवादात ना संस्कृती आहे ना मार्क्स. त्यांनी मार्क्सला केव्हाच रद्द केले आहे. जगभरच्या सर्व मंगलाविरोधातच डावे आहेत. त्यामुळे सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली जगभर व विशेषत: पाशात्य देशात वामपंथीयांनी मांगल्याच्या विरोधात भूमिका घेत विध्वंस सुरू केला आहे. त्यामुळं डाव्यांच्या या संकटापासून मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असं विधामोहन भागवत यांनी म्हणाले.

डॉ. भागवत म्हणाले, दैवी आणि असुरी प्रवृत्तीतील लढाई जुनीच आहे. त्यातील पात्रं, रूप, शस्त्रे बदलली; मात्र, एकच प्रवृत्ती आहे. आजचा संघर्ष देव आणि असुरांमधील संघर्षाचेच आधुनिक रुप आहे. सत्य दडपून असत्यच सत्य असल्याचा भ्रम निर्माण करणं हे अस्त्र असुरी प्रवृत्तींनी आता देशाकडून कुटुंबांपर्यंत आणलं आहे. भारतीय संस्कृती आणि सनातन मूल्यांमध्ये डाव्यांच्या या संकटातून वाचवण्याची ताकद आहे. डाव्यांचा विमर्श खोडून काढण्यासाठी सत्य, करुणा, शुचिता आणि तेजस ही चार तत्त्वे अंगीकारावी लागतील, असंही भागवत म्हणाले.

Tags

follow us

वेब स्टोरीज