महाराष्ट्राच्या राजकारणाचे लक्ष सुप्रीम कोर्टाकडे; दोन ‘सर्वोच्च’ सुनावण्या एकाच दिवशी
Shivsena Hearing : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) अजूनही सुनावणी सुरू आहे. त्यात विविध याचिकांचीही भर पडल्याचे दिसून आले. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीमुळे शिवसेना (Shiv Sena) शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. ठाकरे गटाच्या दोन याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे लागले आहे.
निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह दिले. याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान आज शिवसेनेचे नाव आणि पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या विरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवरही आज सुनावणी होणार आहे.
Rain Update : राज्यात आठवड्यात मध्यम स्वरपाच्या पावसाचा अंदाज, पुणे-मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांना इशारा
गतवर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत शिवसेनेच्या शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केली. कोर्टाने हा अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अद्याप निर्णय घेतला नाही. त्यामुळं नार्वेकरांविरोधात ठाकरे गटाने कोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत पुनर्विचार याचिका दाखल केली होती. आमदारांच्या निलंबनाबाबत अध्यक्षांना तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
या दोन्ही याचिकांवर मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.
दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर आमदार अपात्रतेच्या कारवाईची सुनावणी सुरू असतांना आता सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय होतं, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.