Radhakrishna Vikhe Patil : दूध भेसळ (adulterated milk)करणारे आणि भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्या खासगी किंवा सहकारी दूध संस्थांवर(Cooperative Milk Societies) गुन्हे दाखल करण्यात येणार असून त्यांच्यावर ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला आहे. अशा पद्धतीने कठोर कारवाईमुळे भेसळयुक्त दुधाला आळा बसणार असल्याचा दावा यावेळी दुग्धविकास मंत्री (Minister of Dairy Development)राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाचा दर ठरविण्याबद्दल आयोजित बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना दुग्धविकास मंत्री विखे पाटील म्हणाले की, दुधामध्ये होणारी भेसळ हा गंभीर प्रश्न आहे. (mokka-on-milk-adulterers-minister-of-dairy-development-radhakrishna-vikhe-patil)
अमेरिकेत PM मोदींच्या भाषणावर महिला खासदारांनी बहिष्कार का टाकला? कोण आहेत ‘या’ महिला खासदार?
भेसळयुक्त दूध खरेदी करणाऱ्या दूधसंघ तसेच ज्या व्यापाऱ्यांसाठी भेसळयुक्त दूध तयार केले जात होते, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. कठोर कारवाईमुळे दुधामध्ये भेसळ करण्याचे धाडस कोणीा करणार नाही. दूध भेसळ रोखण्यासाठी तसचे कारवाईसाठी महसूल विभागाची मदत घेतली जाणार असल्याचेही यावेळी मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
वयाच्या 36 व्या वर्षी तरुणासारखा जोश, अश्विनने हवेत झेप घेत पकडला झेल, पाहा व्हिडिओ
प्रत्येक जिल्ह्यामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अन्न व औषध प्रशासन, पशुसंवर्धन अधिकारी, दुग्धविकास अधिकारी असतील असेही यावेळी त्यांनी सांगितले. याबद्दलचा शासन निर्णय दोन दिवसांत येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्या स्तरावरुन सुद्धा दुधामध्ये भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
कमी मनुष्यबळ असल्याने दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई कमी होत असल्याचे अन्न व औषध प्रशासनाकडून बैठकीत सांगण्यात आले. यामुळे आरे विभागातील 250 कर्मचारी अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे वर्ग केले जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. याबाबतचा निर्णय लवकरच होईल असेही सांगितले. त्यामुळे दुधाची भेसळ करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रमाण वाढेल, असा विश्वास यावेळी दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.