‘होय, कोरोनाची लस मोदींनीच तयार केली’; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले!

‘होय, कोरोनाची लस मोदींनीच तयार केली’; फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना ठणकावले!

Devendra Fadnavis replies Uddhav Thackeray : कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांचे कोरोना लसीसंदर्भातले भाषण ऐकवत खिल्ली उडवली होती. त्याला आज कराड येथील सभेत फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

फडणवीस आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. केंद्र सरकारच्या महासंपर्क अभियानांर्गत कराड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला.

शिंदे-फडणवीस सरकारला ‘मॅट’चा मोठा दणका! महसूल अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती

फडणवीस म्हणाले, मोदींनी या देशात कोरोनाची लस तयार केली, असं मी परवा म्हटलेलं उद्धवजींना फार झोंबलं असे म्हणत मी तर म्हणेन होय मोदींनी लस तयार केली त्याचं कारण असं आहे. जगात पाच देश लस तयार करू शकले. कारण मोदींच्या संबंधांमुळे आपल्याला रॉ मटेरियल मिळालं. जे शास्त्रज्ञ लस तयार करत होते. मोदीजी त्यांच्याकडे गेले. त्यांना 1 हजार 800 कोटी रुपये दिले. कोरोनाची लस तयार झाली. त्यानंतर देशातील 140 कोटी नागरिकांना ही लस मोफत देण्याचे काम मोदींनी केले. महाराष्ट्रात तब्बल साडेसतरा कोटी लसी मोफत दिल्याचे फडणवीस म्हणाले. यानंतर आता उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?

देवेंद्र फडणवीस म्हणतात कोविडची लस मोदीजींनी तयार केली आहे. मग संशोधक काय गवत उपटत होते का ? असे अंधभक्त, विश्वगुरू आहेत. त्यांना व्हॅक्सिन देण्याची गरज आहे. असे व्हायरस कुठून येतात. एकापेक्षा एक अवली आहोत. लवली कुणीच नाही. तुम्ही अवली असली तरी जनता तावली आहे. तुमची झोप उडवतील, असा निशाणा उद्धव ठाकरे यांनी साधला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube