Monsoon 2023: गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. दुष्काळी भागातील खरिप पिके जळून गेली होती. तर धरणेही भरली नव्हते. परंतु आता गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यात काही भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही भागात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला आहे.
Bollywood मधील तिसरी-चौथी पिढीही गाजवतीय घराण्यांची नावं; ‘या’ दिग्गजांचे नातूही अभिनयात
नाशिक जिल्ह्यात गुरुवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारीही कोसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाणीपातळी वाढली आहे. नाशिकमध्ये जोरदार पावसाच्या बॅटिंगमुळे गंगापूर धरणांमध्ये दोन दिवसांपासून पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे सुरुवातीला पाचशे क्सुसेकने धरणातून पाणी सोडण्यात आले. शुक्रवारी दुपारी धरणातून दोन हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरीला पूर आला आहे. नाशिक शहरातील रामकुंड परिसरा पाणीपातळी वाढली आहे. दुतोंडा मारुतीच्या कंबरेपर्यंत पाणी आले आहे. सायंकाळीही पाणीपातळी वाढली आहे. या पावसाळ्यात प्रथमच गोदावरीला पूर आला आहे.
Photos : कस्तुरी मालिकेमध्ये नव वळण; कस्तुरी कुबेरांची सून होणार?
नाशिकमध्ये शुक्रवारी दुपारपर्यंत 57 मिलीमीटर पावसांची नोंद झाली आहे. दारणा धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. तर नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत शुक्रवारी सायंकाळी 4842 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यंदा जायकवाडी धरणात कमी साठा आहे. त्यामुळे गोदावरी नदीतून जास्त पाणी वाहिल्यास जायकवाडी धरणात पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे.
पुणे घाटमाथ्यावर धुव्वाधर
पुणे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सुरू असून, त्यामुळे पवण धरण पूर्ण भरले आहे. गुरुवारी या धरणातून 1,500 क्सूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. पर्यटकांची रेलचेल असलेल्या लोणावळ्यात जोरदार सरी बरसत आहे. लोणावळ्यात चोवीस तासांत शंभर मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.