Download App

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मान्सून महाराष्ट्रात दाखल, तब्बल १२ दिवस आधीच ‘कोसळधारा’

मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अवकळी

Monsoon Arrives in Maharashtra : मान्सूनबाबत मोठी बातमी समोर आली आहे. (Monsoon) महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. यंदा तब्बल 12 दिवस आधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत अवकळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झालं आहे त्यामुळे तोही शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय आहे.

केरळ व्यतिरिक्त दक्षिण आणि मध्य अरबी समुद्र, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, लक्षद्वीपचा काही भाग, कर्नाटक, तामिळनाडू, दक्षिण आणि मध्य बंगालचा उपसागर, उत्तर बंगालचा उपसागर आणि ईशान्य राज्यांमध्ये नैऋत्य मान्सून पुढे सरकरणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.

मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पाऊस होणार;या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट

तसंच, सध्या दक्षिण कोकण-गोवा किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. आता येत्या ३६ तासांत हा पट्टा उत्तरेकडे सरकणार आहे. त्यामुळे पश्चिमेकडून काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. देशात मान्सूचा परिणाम शेतीवर होत असतो. मान्सून वेळवर झाल्यास देशातील कृषी क्षेत्राचे उत्पादन चांगले येते. ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्वाचा ठरतो. धरणातील जलसाठ्यात वाढ होत असल्याने पाणी टंचाईचे संकटही दूर होते.

आयएमडीच्या आधीच्या अंदाजानुसार २७ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार होता. म्हणजेच चार दिवस आधी मान्सून दाखल होणार होता. मागील वर्षी केरळमध्ये ३० मे रोजी मान्सून आला होता. यंदा देशभरात पाऊस सरासरी आणि सरासरीपेक्षा जास्त पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

follow us