दिलासा! ‘या’ दिवशी राज्यात दाखल होणार मान्सून; जाणून घ्या हवामान अंदाज

IMD Alert On Monsoon : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना अनेक

IMD Alert On Monsoon

IMD Alert On Monsoon

IMD Alert On Monsoon : मराठवाडा, विदर्भासह राज्यातील अनेक भागात उन्हाचा तडाखा वाढला आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तर दुसरीकडे पुढील काही मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट असणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. याचबरोबर कोकणसह राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा देखील इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हवामान विभागाने (IMD Alert) दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाण्यात उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा, धाराशिव जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. विजांसह होणाऱ्या अवकाळी पावसामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक भागात विजांसह पावासाची शक्यता असताना इतर भागात उन्हाचा चटका कायम राहण्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. याच बरोबर हवामान विभागाने मान्सूनबाबत (Monsoon) देखील महत्त्वाची माहिती दिली आहे.

सुनील तटकरे अन् प्रफुल पटेलांना धक्का; प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावरुन हटवलं?

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केरळ (Kerala) राज्यात मान्सून 26 मे पर्यंत येणार आहे. मान्सूनचे केरळात आगमन झाल्यानंतर पावसाळ्याची अधिकृत सुरुवात हवामान विभागाकडून करण्यात येते. केरळात 26 मे पर्यंत मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून प्रवेश करणार असल्याची शक्यता देखील हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’-

Exit mobile version