आईनेच घेतला पोटच्या मुलाचा जीव अन् लेकीवरही जीवघेणा हल्ला, वाघोलीत धक्कादायक घटना…

Mother Attack On Daughter In Pune :  पुण्यातील वाघोली येथे आईच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वतः आईनेच आपल्या

Mother Attack On Daughter In Pune

Mother Attack On Daughter In Pune

Mother Attack On Daughter In Pune :  पुण्यातील वाघोली येथे आईच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना घडली आहे. स्वतः आईनेच आपल्या 11 वर्षांच्या चिमुकल्याचा गळा चिरून निर्घृण हत्या केली.  तर 13 वर्षांच्या मुलीलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने मुलगी या हल्ल्यातून बचावली असली तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे. वाघोलीत परिसरात या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोलीतील बीएआयएफ (BAIF) रोड परिसरात ही घटना घडली आहे. सोनी संतोष जायभाय असे आरोपी मातेचे नाव आहे. तिने आपला 11 वर्षीय मुलगा साईराज संतोष जायभाय याच्या गळ्यावर वार करून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने आपली 13 वर्षीय मुलगी धनश्री हिच्यावरही प्राणघातक हल्ला चढवला. दरम्यान, या भयंकर हल्ल्यात साईराजचा जागीच मृत्यू झाला, तर धनश्री गंभीर जखमी झाली आहे.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या धनश्रीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. जायभाय कुटुंब हे मूळचे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील असून, कामानीनिमित्ताने ते वाघोली येथे स्थायिक झाले होते. घटनेची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले आहे. मात्र, एका आईने आपल्याच पोटच्या मुलांना संपवण्याचे टोकाचे पाऊल का उचलले? याचे गूढ अद्याप उकललेले नाही.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात राडा, पोलिसांवर दगडफेक; नेमकं कारण काय?

कौटुंबिक वाद, आर्थिक विवंचना की मानसिक आजार? पोलीस या सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. मात्र एका आईनेच आपल्या पोटच्या मुलाची हत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाघोली पोलीस करत आहेत.

Exit mobile version