आर्थिक अडचणींवर मात करत 3 वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन रिक्षा चालवत आईचा संघर्ष

आर्थिक अडचणी, घरातील जबाबदाऱ्या आणि मुलीची काळजी या सगळ्यांशी झुंज देत त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

Untitled Design 18

Untitled Design 18

Mother struggles while driving a rickshaw with her 3-year-old daughter : आयुष्यातील कठीण परिस्थितीशी दोन हात करत आपल्या मुलीचे उज्वल भविष्य घडवण्यासाठी कल्याणमधील कोमल गायकवाड या रिक्षा चालवत संघर्ष करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्या दिवसभर आपल्या तीन वर्षांच्या मुलीला म्हणजेच तेजस्विनीला घेऊन रिक्षा चालवतात. आर्थिक अडचणी, घरातील जबाबदाऱ्या आणि मुलीची काळजी या सगळ्यांशी झुंज देत त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.

कोमल गायकवाड यांची घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यातच घर भाड्याचे असल्यामुळे कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागत आहेत. सासू आजारी असल्याने त्यांचे पती गावी राहतात. त्यामुळे मुलीची काळजी घेण्यासाठी घरी कोणीही नसल्याने कोमल यांना मुलगी तेजस्विनीला सोबत घेऊनच कामावर जावे लागते.

मानाची गदा मोहोळ कुटुंबाची पण महाराष्ट्र केसरीला मिळणाऱ्या फॉर्च्युनरचं गुपित काय? आयोजकांनी सांगितलं नावं

सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत त्या रिक्षा चालवत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. शिक्षण कमी असल्यामुळे आणि लहान मुलीसोबत कोणतेही काम देण्यास अनेकजण तयार नसल्याने त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. कष्टाची भीती न बाळगता त्यांनी परिस्थितीशी सामना करण्याचा मार्ग निवडला. रिक्षा चालवताना मुलीची सुरक्षितता आणि सोय लक्षात घेऊन कोमल गायकवाड यांनी रिक्षामध्ये मुलींसाठी खास बसण्याचा स्टॅन्ड तयार करून घेतला आहे. त्या स्टॅण्डमध्ये तेजस्वी त्यांच्या शेजारी आरामात बसते. त्यामुळे प्रवाशांना देखील प्रवासादरम्यान कोणताही त्रास होत नाही.

दिवसभर कष्ट करणारी ही माय-लेकरांची जोडी अनेकांच्या नजरेत भरत आहे. आयुष्यातील कठीण परिस्थितीला न डगमगता कोमल गायकवाड आपल्या मुलींसाठी स्वप्न पाहत आहेत. माझ्यावर जशी परिस्थिती आली तशी माझ्या मुलीवर येऊ नये. तिला चांगले शिक्षण देऊन पोलीस अधिकारी बनवायचे आहे, असे त्यांचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. आईच्या कष्टांतून आणि जिद्दीमधून उभा राहिलेला हा संघर्ष अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Exit mobile version