Download App

नवीन व्हिपसाठी हालचाली सुरु, खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं…

सर्वोच्च न्यायालायाने भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती अवैध ठरवल्याने आता शिवसेना शिंदे गटाकडून नवीन व्हिपच्या निवडीसाठी हालाचाली सुरु केल्या आहेत. नवीन प्रतोद निवडण्यासाठी आजपासून प्रक्रिया सुरु करणार असल्याचं खासदार राहुल शेवाळेंनी सांगितलं आहे.

The Kerala Story: अभिनेत्री अदा शर्मा पोहोचली महादेवाच्या दरबारी; ‘शिवतांडव’चा जप करतानाचा Video Viral

खासदार शेवाळे म्हणाले, राज्यात स्थापन झालेलं शिंदे सरकार संविधानानूसार स्थापन झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय. भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर नसून प्रक्रियेच्या सूचनांचं पालन करण्यात आलेलं नसल्याचं न्यायालयाने म्हटलं, असल्याचंही शेवाळेंनी स्पष्ट केलंय. तसेच आता नव्या प्रतोदसाठी निवड करण्याची प्रक्रिया आम्ही आजपासूनच सुरु करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

‘त्या’ आमदारांना सभापतींनी अपात्र ठरवावे; अभिषेक मनु सिंघवी यांची प्रतिक्रिया

भरत गोगावलेंची निवड अवैध ठरवल्याने आता सुनिल प्रभू यांचा व्हिप लागू होतो पण 16 आमदारांना अपात्र करण्याची मागणी होत असल्याने व्हिपची निवड राजकीय पक्षानेच करायला पाहिजे, असं मत न्यायालयाने नोंदवल्याने आजपासून आम्ही नवा व्हिप निवड करण्याची प्रक्रिया सुरु करीत असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे ठरवतील तोच व्हिप यापुढे असणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

सत्तासंघर्षावर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, आमचा प्लॅन तयार

दरम्यान, दहाव्या सूचीनूसार राजकीय पक्षाचा महत्वपूर्ण मानला जातो. सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान, ठाकरे व्हिप महत्वाचे होते. विधीमंडळ पक्षाने व्हिपपासून स्वत:ला दूर करणं म्हणजे पक्षाशी नाळ तोडण्यासारखं असल्याचं न्यायालयाने म्हटलंय.

शिवसेना पक्षाच्या सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तर एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून सर्वांनी एकमताने निवडलं होतं. त्यामुळे आता अधिकृत व्हिप कोणाचा समजून घेण्याचा प्रयत्न झाला नसल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलंय.

Tags

follow us