सत्तासंघर्षावर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, आमचा प्लॅन तयार

सत्तासंघर्षावर बावनकुळेंचं मोठं विधान; म्हणाले, आमचा प्लॅन तयार

Ekanath Shinde Vs Uddhav Thackeray :  आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. निकाल येण्यास काही तासच शिल्लक राहिलेले असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) अचानक नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठे विधान केले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आमच्या सरकारला कुठलाही धोका नाही. आमचा 2024 चा प्लॅन पक्का आहे. आम्ही त्याची तयारी करतोय. जास्त भर आमचा 2024वर आहे. सरकार बहुमतात आहे. उद्या बहुमत सिद्ध करायला सांगितले तरी आकडे वाढतील. कुठल्याही परिस्थितीत बहुमताचा आकडा कमी होणार नाही, असे ते म्हणाले आहेत.

Maharashtra Political Crises : नॉटरिचेबल झिरवळ माध्यमांसमोर; म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार

तसेच 48 लोकसभा, 200 हून अधिक विधानसभा जागा जिंकण्यावर आमचा भर आहे. निकाल लागला म्हणजे सरकार कोसळणार, राष्ट्रपती राजवट लागणार, निवडणुका लागतील यापैकी काहीही होणार नाही. हे सरकार जनतेने स्वीकारले आहे. भाजप-शिवसेनेचेी नैसर्गिक युती असल्याचे देखील ते म्हणाले आहेत.

Anil Parab : शिंदे गटाचे फक्त 16 नाही, तर तब्बल 39 आमदार अपात्र होणार

दरम्यान, शिंदे विरुद्ध ठाकरे या सत्तासंघर्षावर आज निकाल लागणार आहे. या निकालाकडे सगळ्या देशाचे लक्ष लागले आहे. सत्ता संघर्षावर आज निकाल लागणार आहे. या निकालात सर्वोच्च न्यायालय 16 आमदारांना अपत्रा ठरवार की त्यांच्या बाजूनं निकाल देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सत्ता संघर्षाच्या या सर्व सुनावणीदरम्यान 16 आमदारांचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा मनाला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube