Download App

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी अन् महायुती आमनेसामने; बदलापूरच्या घटनेवर वार-प्रतिवार

दलापूरमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडी महायुती समोरासमोर.

  • Written By: Last Updated:

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते, कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. येथील क्रांती चौकात दोन्ही बाजूने आंदोलन सुरु करण्यात येत आहे. (Sambhajinagar) राज्यातील बहीण सुरक्षित नाही असा आरोप महाविकास आघाडीकडून केला जात आहे. तर, तुम्ही याचं राजकारण करत आहात असा आरोप भाजपकडून केला जात आहे. या सर्व घटनेत काही अनुचित प्रकार घडू नये यासठी मोठा पोलीस बंदोबस्त क्रांतीचौकात तैनात करण्यात आला आहे. सरकारमधील मंत्री अतुल सावेही आंदोलनात सहभागी झाले आहेत.

पोलीस कर्मचाऱ्याकडून डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण; छत्रपती संभाजीनगरमधील घटना, तरूण जखमी

या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव सेना असे तीनही पक्ष आंदोलनात उतरले होते. मोठ्या संख्येने या आंदोलनासाठी गर्दी देखील करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने महाराष्ट्र बंद बाबत दिलेला निर्णयामुळे मविआ ने बंद मागे घेतला होता. दरम्यान, यावेळी शिवसेनेचे अंबादास दानवे माजी महापौर नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, राजू शिंदे संतोष जेजुरकर शहर प्रमुख बाळासाहेब थोरात ज्ञानेश्वर डांगे,आनंद तांदुळवाडीकर, अनिल पोलकर, हे सगळे उपस्थित होते.

बदलापूर लैंगिक अत्याचार घटनेचा SIT कडून प्राथमिक रिपोर्ट सादर; धक्कादायक माहिती आली समोर

यावेळी शहरातील महिला मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला एक चक्कर मारून या घटनेतील मुलींना न्याया द्यावा असे बॅनर झळकवण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जालन्याचे खासदार कल्याण काळेही क्रांती चौकात आले होते. त्यांनी या घटनेचा तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. तसंच, या सरकारने आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.

 

follow us