पोलीस कर्मचाऱ्याकडून डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण; छत्रपती संभाजीनगरमधील घटना, तरूण जखमी

पोलीस कर्मचाऱ्याकडून डिलिव्हरी बॉयला बेदम मारहाण; छत्रपती संभाजीनगरमधील घटना, तरूण जखमी

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Crime) पार्सल देण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून एका पोलीस कर्मचाऱ्याने डिलिव्हरी बॉय लाठ्याकाठ्याने बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोक्याला, पाठीला आणि ओठाला गंभीर जखम झाली आहे.

बदलापूर घटनेवर बोलताना अजितदादांचे केंद्राकडे बोट; म्हणाले, मविआ सरकारमध्ये कायदा

वृत्तपत्र वाटप करण्याचं काम

ही घटना येथील अविष्कार कॉलनीत घडली आहे. या घटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणी मोजर पोलीस कर्मचारी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला निलंबित करण्यात आलं आहे. जितेंद्र मानके (वय ३०) असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. जितेंद्र हा २००७ पासून वृत्तपत्र वाटप करण्याचं काम करतो. एकट्या व्यवसायावर घर चालवणं शक्य नसल्यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन संकेतस्थळाचे पार्सल पोहोचवण्याचं काम देखील करतो.

पार्सल लवकर घेऊन या

जितेंद्र हा पार्सल वाटप करत होता. त्याच्याजवळ असलेल्या सर्व ८५ पार्सलपैकी एक पार्सल हे सिडको पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या जीवन शेजवळ नावाच्या पोलीस कर्मचाऱ्यांचं होतं. या पोलीस कर्मचाऱ्याने जितेंद्रला पार्सल लवकर घेऊन या, असं म्हटलं. मात्र नियोजित पार्सल वाटप करत असल्यामुळे त्याला पोलीस कर्मचाऱ्यापर्यत पोहोचण्यास उशीर झाला.

बदलापूर घटनेत पोलिसच खरी समस्या; बालहक्क आयोगाच्या अध्यक्षांचं मोठं वक्तव्य

कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

जितेंद्र हा अविष्कार कॉलनीत पार्सल घेऊन पोहोचल्यानंतर मजूर पोलीस कर्मचारी जीवन शेजवळ हा फायबरची काठी घेऊन बाहेर उभा होता. जितेंद्र पोहोचताच त्याने शिवीगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. एवढी जबर मारहाण केली की, त्याच्या डोक्याला, पोटाला आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या. सिडको पोलीस ठाण्यामध्ये संबंधित मुजर कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचं निलंबन करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनीत कावत यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या