Download App

राज ठाकरेंना विरोध करणारे बृजभूषण सिंह सीएम, डीसीएमशेजारी…

अयोध्येत आज मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांसोबत उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण शरण सिंह देखील दिसून आले आहेत. बृजभूषण शरण सिंह यांनी मागील वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. बृजभूषण सिंह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याशेजारीच दिसून आल्याने चर्चांना उधाण आलंय.

आसामचे मुख्यमंत्री आता गांधींविरोधात आक्रमक!… म्हणाले १४ एप्रिलनंतर खेचणार…! 

अयोध्येत आज मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीसांसोबत उत्तर प्रदेशचे खासदार बृजभूषण शरण सिंहही दिसून आले आहेत. बृजभूषण शरण सिंह यांनी मागील वर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता.

भारतीय लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला, एक पाकिस्तानी घुसखोर ठार

आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी मगच त्यांनी अयोध्या दौरा करावा, अन्यथा राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशात पाय ठेवून देणार नसल्याचा पवित्रा बृजभूषण शरण सिंह यांनी घेतला होता.

बृजभूषण सिंह यांच्यासोबत बाबरी मशीद प्रकरणात वादी असलेले इकबाल अंसारी यांनीही राज ठाकरेच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानंतर राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला होता.

NZ vs SL : टिम साइफर्टच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने तिसरा टी-20 सामना जिंकला

यावेळी मंचावर इतरही उत्तर प्रदेशातील नेते दिसून आले असून मंचावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तीप्रदर्शन केलं आहे. “जो राम की बात करेंगा वोही देश पे राज करेंगा” अशा घोषणा फडणवीसांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अयोध्या दौऱ्यावर होते. अयोध्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकेची तोफ डागलीय.

दरम्यान, राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध केल्यानंतर आज बृजभूषण सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमवेत मंचावर दिसले आहेत. मंचावर सिंह दिसून आल्याने महाराष्ट्रात राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

Tags

follow us