आसामचे मुख्यमंत्री आता गांधींविरोधात आक्रमक!… म्हणाले १४ एप्रिलनंतर खेचणार…! 

आसामचे मुख्यमंत्री आता गांधींविरोधात आक्रमक!… म्हणाले १४ एप्रिलनंतर खेचणार…! 

Himanta Biswa Sarma : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल यांनी रविवारी केलेले ट्विट अपमानास्पद असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येथून परत गेल्यावर म्हणजे १४ एप्रिलनंतर त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. आपण अजूनही अरविंद केजरीवाल यांच्या निमंत्रणाची वाट पाहत आहोत, असे म्हणत त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार प्रहार केला.

राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये उद्योगपती उद्योगपती गौतम अदानी यांच्यासह सहा नेत्यांवर निशाणा साधला होता. गौतम अदानी, गुलाम नबी आझाद, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण कुमार रेड्डी, हिमंता बिस्वा सरमा आणि अनिल अँटनी यांना लक्ष्य केला होते. राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये तो सत्य लपवतो, म्हणून तो दररोज दिशाभूल करतो. प्रश्न एकच आहे. अदानींच्या कंपन्यांमध्ये वीस हजार कोटी रुपयांचा बेनामी पैसा कोणाचा आहे.?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी जोरदार हल्ला चढवला. सरमा म्हणाले की, बोफोर्स आणि नॅशनल हेराल्ड घोटाळ्यांतील गुन्ह्यांचे पैसे तुम्ही कुठे लपवले हे आम्ही तुम्हाला कधीच विचारले नाही. ही आमची नम्रता असल्याचे सरमा यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच ठीक आहे, असे म्हणत आम्ही तुम्हाला न्यायालयात भेटू म्हणत एकप्रकारे मानहानीचा दावा करणार असल्याचा इशारा दिला आहे.

घराणेशाहीबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणतात… – Letsupp

मुख्यमंत्री सरमा म्हणाले, पंतप्रधान मोदी सरूजाई स्टेडियममधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ते १७०९ कोटी रुपये खर्चून स्थापन केलेल्या नामरूप येथे आसाम पेट्रो केमिकल्स लिमिटेड ५०० टीपीडी मिथेनॉल प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. पलासबारी-सुलकुचीला जोडणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवरील ३ हदार १९७ कोटी रुपये खर्चाच्या दुसर्‍या पुलाची ते पायाभरणी करणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एम्स गुवाहाटी येथून अनेक कार्यक्रम सुरू करणार आहेत. आयआयटी गुवाहाटी कॅम्पसमध्ये एक हॉस्पिटल बांधणार आहे. पंतप्रधान मोदी त्याची पायाभरणी करणार आहेत. तर गुवाहाटी येथील शंकरदेव कलाक्षेत्र येथे गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या प्लॅटिनम ज्युबिली समारंभाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहणार आहेत. 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube