घराणेशाहीबद्दल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणतात…
घराणेशाहीला माझा विरोध असून कार्यकर्ता नेता होत असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर हॅंडलवरुन जनतेशी प्रश्नोत्तराप्रमाणए संवाद साधला. यावेळी त्यांनी आपलं स्पष्ट मत व्यक्त केलंय.
तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल..
मी सुद्धा घराणेशाहीच्या विरोधात आहे. पार्टी स्ट्रक्चरला ताकद दिली पाहिजे. कार्यकर्त्याला नेता होत असेल तर त्याला ताकद दिली पाहिजे.. हा मोठा आणि सकारात्मक बदल आहे.. पण त्याला वेळ लागेल..#AskRohitPawar https://t.co/DPt3zvwbOd— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
आमदार रोहित पवार यांनी आज पुढील 20 मिनिटे तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी माझी उत्तरे तयार आहेत, चला सुरुवात करुया, असं आवाहन केलं होतं. त्यानुसार अनेकांनी ट्विटरद्वारे रोहित पवारांना प्रश्न विचारले. त्यामध्ये मनोज पवार नामक युवकाने त्यांना घराणेशाहीवरुन एक प्रश्न विचारला. पवार यांच्या प्रश्नाचं उत्तर आमदार पवार यांनी दिलं आहे.
क्रिकेटमधे राजकारण आणू नको.. आणि व्याप्ती एवढी वाढव की जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देता येईल.
निवडक हिरे पुढे आणता येतील जे केवळ महाराष्ट्राचं नाही तर देशाचं नेतृत्व करतील..#AskRohitPawar https://t.co/g3p0ME0z8c— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घराणेशाहीला फाटा देऊन नव्या तरुणांना संधी देण्यासाठी इच्छूक आहात का? तसेच कार्यकर्त्याच्या कर्तुत्वाला संधी मिळेल काय? असा सवाल करण्यात आला होता. पवार यांच्या प्रश्नावर घराणेशाहीला माझा विरोध असल्याचं आमदार पवारांनी म्हटंलय.
पंडित जवाहरलाल नेहरुजी#AskRohitPawar https://t.co/FCpylrEsFz
— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
दरम्यान, देशात काँग्रेस सारख्या पक्षात कायमच घराणेशाहीचा सूर लावण्यात येत असल्याची चर्चा सुरु होती. अखेर निवडणुकीनंतर आता काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे सध्या काँग्रेसचे प्रमुख आहेत. पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आपल्या मुलांना पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्षपदी बसवत असतो. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता कधी? राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत पोहचू शकत नाही, अशी चर्चा कायमच कार्यकर्त्यांमध्ये सुरु असते. त्यावरुनच पवार यांनी हा प्रश्न पडलेला असावा आणि त्यांनी प्रश्नोत्तरांच्या संवादात हा प्रश्न विचारला असल्याचं दिसतंय.
राजकारण नको रे बाबा हे तुम्ही म्हणता तेंव्हा येतं.. पण माझी मुलं जेंव्हा विचारतात की डॅडा तुम्ही जेंव्हा आईच्या सोशल मीडियावर इतर लहान मुलांशी खेळताना दिसता, आम्हाला कधी वेळ देणार?
तेंव्हा असं वाटतं की आपण त्यांना वेळ द्यायला हवा.. https://t.co/V3tkan53ZH— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 9, 2023
या संवादादरम्यान, अनेकांनी आमदार रोहित पवारांनी प्रश्न विचारला असून यामध्ये घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्याने आमदार रोहित पवार हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आहेत. त्यावरुन आता आगामी काळात राष्ट्रवादीचा प्रमुख कोण असणार? याबाबत अनेकांच्या मनात शंकाकुशंका आहेत. अशातच आमदार रोहित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करुन कर्तुत्वान कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे, अशी भूमिका मांडलीय.