MP Nilesh Lanke With Letsupp Marathi : लोकसभा निवडणुकीला (Lok Sabha) एक वर्ष पूर्ण झालंय. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने खासदारांच्या रिपोर्ट कार्डचा आढावा घेतला. यावेळी खासदार निलेश लंके यांच्यासोबत संवाद साधला. यावेळी निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अनेक विषयांवर सडेतोड भाष्य केलंय. राणीताई लंके (Rani Lanke) यांना विधानसभेत पराभवाला सामोरं जावं लागलं. यावेळी नेमकी कोणती गणितं चुकली, सतत होणारी ट्रोलिंग यावर खासदार लंके यांनी भाष्य केलंय.
लंकेंनी सांगितली दोन हत्तींची गोष्ट
कोणतेच गणितं चुकली नाहीत. दीड-दीड लाख मतांनी निवडून येणारी लोकं नऊ अन् दहा हजार मतांनी निवडून आले. कोल्हापूरमध्ये सगळे मतदार एकाच लीडने कसे निवडून आले, याचा विचार व्हायला पाहिजे. मी आरोपांचा विचार (Maharashtra Politics) करीत नाही. मी काम करणारा माणूस आहे. यावेळी निलेश लंके यांनी हत्तीची गोष्ट सांगितली. दोन हत्ती चालत असताना कुत्रा भुंकतो, एक त्या आवाजाकडे लक्ष देतो, तर दुसरा सरळ चालतो. राजकारणात चालताना टीका टिप्पणी होत असते. राजकारणात डिस्टर्ब व्हायचं नाही, असं ते म्हणाले आहेत.
सत्यजित तांबेंचं बोलणं बालिशपणाचं…; बाळासाहेब थोरातांनी टोचले कान
ट्रोलिंग अन् मीडिया
ट्रोलिंगवर निलेश लंके यांनी म्हटलंय की, रोज मोबाईल घ्या अन् तेच धंदे करत बसा. दम असेल तर नाव घेऊन टीका करा. नगरमध्ये अतिवृष्टी झाली. दिल्लीवरून आल्यानंतर मी लगेच तिथे गेलो अन् एखाद्या खासदारासारखं नाही तर सामान्य नागरिकांसारखी मदत केली. मी मिडिया घेऊन फिरत नाही. मी काम करताना तो फोटो काढतो अन् तेच लोकं व्हायरल करतात. अख्या मतदारसंघात मी रात्रंदिवस फिरत आहे. जीवाची पर्वा करत नाही, असंही लंके यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, ‘हा’ मोठा नेता अजित पवारांच्या गळाला, प्रवेशही ठरला
महाविकास आघाडीतील नेत्यांनी विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी मदत केली नाही, असा आरोप शिवसैनिक करत आहे. यावर लंके म्हणाले की, मी महाविकास आघाडीचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा खासदार म्हणून निवडून आलोय. जर तुमच्या पक्षाच्या नेतृत्वाने बाजू घेतली नाही, तर यात आमचा काय दोष? असा सवाल लंके यांनी केला आहे. रोहित पवार आमचे नेते आहेत. त्यांना मी मार्गदर्शन करीत नाही, असंही ते म्हणाले आहेत. माझ्यादृष्टीने काम होणं गरजेचं आहे, झंडा कोणाचाही असेना.
शिळी भाकरच गोड…
यावेळी बोलताना निलेश लंके यांनी म्हटलं की, मला दोन दिवसाची शिळी भाकर आवडते. फाईव्ह स्टार हॉटेलचं जेवण आवडतं नाही. रोजच्या दैनंदिन जीवनातील वस्तू आहे. मला एखाद्याने घड्याळ दिलं तर त्यामागे सुद्धा आपुलकी लागते. सुरक्षिततेसाठी मला चांगली गाडी वापरावी लागते, असं खासदार निलेश लंके यांनी म्हटलं आहे