MP Nilesh Lanke : दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनावरती प्रतिक्रिया देताना खासदार निलेश लंके म्हणाले समाजासाठी लढणारे वांगचुग असतील किंवा अभिजीत दिपके असतील पेपर फुटी असतील किंवा अन्य विषयांसाठी आमच्या तरुणांच्या बाबतीत लढा देणाऱ्या या आंदोलकांवरती चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे उपोषण सोडण्याऐवजी सरकारकडून चुकीचे पावले उचलत जात असल्याच्या घटनेचा निषेध लंके यांनी केला.
तसेच पुढे बोलताना लंके (MP Nilesh Lanke) म्हणाले की, आंदोलकांना उचलून पोलीस स्टेशनमध्ये नेले जात आहे त्यांच्यावरती अश्रदुरांचा फवारा केला जात आहे. त्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकारकडून दडपशाही केली जात आहे. आंदोलन हे सर्वसामान्यांसाठी आंदोलन करत आहे. त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी आंदोलन करत आहेत सरकारकडून झालेल्या चुकांचा विचारण्यासाठी आंदोलन सुरू असून सरकारने आंदोलकांची भेट घेतली पाहिजे असे देखील लंके म्हणाले.
आंदोलकांची भेट घेतली पाहिजे. त्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे. पेपर फुटी प्रकरणातील दोषींवरती कारवाई करा. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाला आहे. त्यांना वर्षभराची सवलत देऊ अशा पद्धतीने या प्रश्नावर मार्ग काढला पाहिजे मात्र दडपशाहीच्या मार्गाने हे आंदोलन मोडीत काढण्याचे काम सरकारकडून सुरू आहे.
CJP च्या आंदोलनामागे पाकिस्तान? सुरक्षा यंत्रणांकडून तपास सुरु
तुम्ही जेवढे तीव्रतेने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करतात तेवढ्याच तीव्रतेने याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. सरकारच्या या दडपशाही विरोधात बेरोजगार तरुण असतील किंवा बळीराजा असेल थेट रस्त्यावर उतरून सरकारचा निषेध करेल. तसेच या आंदोलनकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मी देखील या आंदोलनाला पाठिंबा देणार असल्याचं परखड मत यावेळी खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
