Sanjay Raut On Nitin Gadkari : पुण्यातल्या लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (Lokmanya Tilak Memorial Trust) वतीनं देण्यात येणारा प्रतिष्ठेचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार (Lokmanya Tilak National Award) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जाहीर झाला. लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक (Rohit Tilak) यांनी गडकरींच्या नावाची घोषणा केली. गडकरी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याचा साऱ्यांनीच आनंद व्यक्त केला. खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) देखील गडकरींसाठी खास पोस्ट लिहिली.
Mahadev Munde : आम्ही मुंडे कुटुंबियांसोबत, 8 दिवसांत कारवाई करा, अन्यथा…; जरांगेंचा सरकारला इशारा
गडकरी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील मातब्बर नेतेमंडळींपैकी एक आहेत. भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. गडकरी यांना हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संजय राऊतांनी एक्सवर एक खास पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! राजकारणातील योग्य व्यक्तीचा गौरव केल्या बद्दल पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे कौतुक!, असं ते म्हणाले.
देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
राजकारणातील योग्य व्यक्तीचा गौरव केल्या बद्दल पुरस्कार देणाऱ्या संस्थेचे कौतुक!
@nitin_gadkari pic.twitter.com/DCowfLVDor— Sanjay Raut (@rautsanjay61) July 23, 2025
पुरस्काराची घोषणा झाल्यावर कांचन गडकरी यांनी आनंद व्यक्त केला. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना लोकमान्य टिळकांचे नाव माहित आहे. नितीनजींना त्यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हा खूप आनंदाचा क्षण आहे. घरामध्ये सर्वांना आनंद झाला आहे. नितीनजींना शेती आणि इतर कामांसाठी आतापर्यंत १३ डी.लिट पदव्या मिळाल्या आहेत. पण टिळकांच्या नावाने मिळणारा हा पुरस्कार आगळावेगळा आहे. पुरस्कार जाहीर झाल्यावर अनेकांचे फोन येत आहेत, असं त्या म्हणआल्या.
दरम्यान, १ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळकांच्या १०५ व्या पुण्यतिथीच्या दिवशी या पुरस्कारचे वितरण होणार आहे. स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि १ लाख रुपये रोख असे या पुरस्कारचे स्वरूप आहे.
या पुरस्कार वितरण समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते या पुरस्कार वितरण होईल.