Supriya Sule On Pune Police : पुणे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आज (26 मे) पासून ते 8 जून 2026 पर्यंत जमावबंदीचे आदेश पुणे पोलीस आयुक्तालाने लागू केले आहे. या आदेशानंतर पुण्यात 14 दिवस जमावबंदी कायदा लागू राहणार आहे. तर आता या निर्णयाविरोधात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पुणे पोलिसांवर (Pune Police) जोरदार हल्लाबोल करत खरमरीत सवाल केला आहे.
नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री 10 वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या 24 तास काम करणारे शहर झाले आहे. या शहरात हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांच्या पोटावर पाय देऊन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहतंय ?
एकतर पुण्यातली वाढती गुन्हेगारी थांबविण्यात पोलीसांना अद्याप किंचितही यश आलेले नाही. शहरात गुन्हेगारी सतत वाढत असून महिलांना, बालकांना सुरक्षित वातावरण पोलीस देऊ शकत नाहीत. कोयता गँग रोज नव्या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. गोळीबाराच्या, लूटमारीच्या, दहशत माजविल्याच्या घटना सर्रास घडत आहेत. कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या अशा परिस्थितीत छोट्या व्यावसायिकांची दुकाने बंद करुन पोलीस प्रशासन नेमकं काय सिद्ध करु पाहत आहेत ?
पुणे शहरात चौदा दिवसांची जमावबंदी /प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत रात्री दहा नंतर फेरीवाले, छोटे व्यापारी, खाऊ गल्ली येथे व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना रात्री १० वाजता दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे. पुणे हे सध्या २४ तास काम करणारे शहर झाले…
— Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2026
पोलीस आयुक्त, जमाबंदी नाही प्रतिबंधात्मक आदेश असं म्हणत आहेत. जर हे असं असेल तर नेमका प्रतिबंध कशाला आहे? महत्वाचे म्हणजे फक्त सणांच्या काळातच पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेला नेमका कसा धक्का लागणार आहे ? हा तर आजारापेक्षा उपचार भयंकर असा प्रकार आहे असं सुप्रिया सुळे यांनी एक्सवर म्हटले आहे.
देशाच्या इतिहासात प्रथमच मिळणार पाण्याचा ‘सातबारा’; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय-
तर दुसरीकडे सणांच्या काळात शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.
