Supriya Sule on Crop Insurance Scam in Lok Sabha : संतोष देशमुख प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रोज नवेनवे आरोप होत असताच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या काळात (Crop) पीकविमा घोटाळा झाला असा आरोप होत असल्याचा उल्लेख लोकसभेत केला आहे. सुळे यांच्या या आरोपांमुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Video : सगळ्या प्रकरणाचा धनंजय मुंडेच कर्ता करविता; जरांगे पाटलांची वादळी पत्रकार परिषद
भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीकविमा घोटाळा झाला याचा पाडाच विधानसभेत वाचून दाखवला होता. त्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची थेट कबुलीच दिली होती. मात्र, ५०० नाही तर पाच हजार कोटींचा तो घोटाळा आहे असं म्हणत आमदार धस यांनी राज्यात वेगळात बॉम्बस्फोट केला होता. त्यानंतर आता सुळे यांनी थेट लोकसभेत यावर भाष्य केल्याने याव विषयाला नव वळन मिळालं आहे.
काय म्हणाले होत धस ?
भाजप आमदार सुरेश धस मीडियाशी संवाद साधत होते. तुम्ही पिक विमा कर्जाच्या घोटाळ्यावर भाष्य केलं. त्यामुळे सव्वा चार लाख कर्ज अवैध असल्याचं समोर आलं. सरकारचं मोठं नुकसान होताना वाचलं, असं सुरेश धस यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी हा मुद्दाच फेटाळून लावला. सरकारचं नुकसान वाचलं नाही. तुम्ही थोडं मागे जाऊन पाहा. काही शेतकऱ्यांनी कर्जाचे पैसे उचलून नेले आहेत. त्यामुळे शासनाचे पैसे वाचले असं म्हणता येत नाही. शासनाने फक्त साडेतीनशे कोटी रुपयांचा घोटाळा दाखवला. पण माझं मत आहे की हा भ्रष्टाचार पाच हजार कोटीच्यावर जाणार आहे, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे.
सेंटर एकाच तालुक्यात कसे?
या घोटाळ्यातील सीएससी सेंटरवाले प्यादे आहेत. हे सेंटर एकाच तालुक्यात कसे जातात? सर्व शेतकरी दोषी आहेत असं म्हणत नाही. ठरावीक शेतकरी दोषी आहेत. आठ जिल्ह्यात पीक विमा भरणारे शेतकरी एक शेतकरी असू शकतो का?, असा सवाल सुरेश धस यांनी केला.
अंजली दमानिया यांचे आरोप
नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाल्डे हाइड आणि कापूस गोळा करण्यासाठीच्या बॅगा. भ्रष्टाचार म्हणतो, पण तो किती पट झाला हे दिसेल. या सर्वांचे दर दाखवते. नॅनो युरिओ आणि नॅनो डीएपी या इफको नावाच्या कंपनीचे आहेत” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “नॅनो एरियाचा १८४ पर लिटर दर आहे. म्हणजे ५०० मिलिलीटरच्या बॉटलला ५०० रुपये मिळतात. पण मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली जे टेंडर काढलं गेलं. ती २२० रुपयात घेतली गेली. सिंगल बॉटल बाजारात ९२ रुपयाला मिळते. पण मुंडे यांनी १९ लाख ६८ हजार ४०८ बॉटल या २२० रुपयाने घेतल्या. म्हणजे दुपटीपेक्षा जास्त किंमतीने बॉटल घेतल्या” असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना पीक विम्यात ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप होतोय. तर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी ५०० नाही पाच हजार कोटींचा घोटाळा झालाय असं म्हटलय. आता हा मुद्दा खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत उपस्थित केला.@supriya_sule @dhananjay_munde #LokSabha pic.twitter.com/4Ej1Jx5gs2
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) February 4, 2025