Download App

हे विसरू नका! न्यायालयाकडून दिलासा मिळताच रोहित पवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा…

Mla Rohit Pawar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोच्या प्लांटवर कारवाई करण्यास उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदुषण विभागाकडून(MPCB) बारामती अॅग्रोच्या(Baramati Agro) दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या प्रकरणी आता रोहित पवारांनी(Rohit Pawar) दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर पवार यांनी न्यायालयाचे आभार मानत सत्ताधाऱ्यांनी इशाराच दिला आहे. यासंदर्भात रोहित पवार यांनी ‘एक्स’ वर प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित पवार म्हणाले, “बारामती ॲग्रॉ’ च्या प्लांटवर कारवाई करण्यास स्थगिती दिल्याबद्दल मी सर्वप्रथम मा. हाय कोर्टाचे आभार मानतो… तोडफोड करून मिळवलेल्या सत्तेच्या छत्राखाली राहून सुडाचं राजकारण करणं सोपं आहे, ते करणाऱ्यांनी करत रहावं.. त्यांच्यावर सूड कसा उगवायचा याचा निर्णय निवडणुकीत जनता घेईल…

पण यानिमित्ताने माझं त्यांना एक सांगणं आहे की, महाराष्ट्रात कधीही नव्हता तो राजकीय द्वेषाचा घाणेरडा पायंडा तुम्ही पाडताय… एका अर्थाने राजकीय द्वेषाचे बाप तुम्ही आहात, पण लोकशाहीत सामान्य जनता ही बाप असते, हे विसरू नका. त्यामुळं आज जरी तुम्ही खुशीत असलात तरी भविष्यात हेच अस्र तुमच्यावरही उलटल्याशिवाय राहणार नाही..’जिनके घर शीशे के होते हैं, वे दूसरों पर पत्थर नहीं फ़ेंका करते” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Gujarat Drugs : गुजरात पोलिसांची मोठी कारवाई; 800 कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्ज जप्त

महाराष्ट्र प्रदुषण विभागाकडून 27 सप्टेंबरला रोहित पवारांच्या कंपनीला नोटीस बजावत 72 तासात संबंधित युनिट बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर या नोटीसीला कंपनीने हायकोर्टात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी पार पडली. यात संपूर्ण घटनेची वस्तुस्थिती लक्षात घेत हायकोर्टाने याप्रकरणात 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले आहेत.

Priya Bapat: प्रिया बापटने शेअर केला पती उमेश कामत सोबतचा रोमँटिक फोटो, म्हणाली…

न्यायालयाच्या या आदेशामुळे संबंधित कंपनी आपले काम नियमित सुरू ठेऊ शकणार असून, आजच्या आदेशामुळे न्यायालयीन प्रक्रियेवरील विश्वास दृढ झाल्याचे मत रोहित पवार यांच्या कंपनीकडून व्यक्त केला होता.

रोहित पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान, येत्या 6 ऑक्टोबरपर्यंत बारामती अॅग्रोच्या प्लांटवर महाराष्ट्र प्रदुषण विभागाने कोणतीही कारवाई करु नये, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.

Tags

follow us