Download App

MPs Suspended : खासदारांच्या निलंबनाचे पडसाद; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या रिबिन लावत विरोधक आक्रमक

  • Written By: Last Updated:

MPs Suspended : लोकसभेचे हिवाळी अधिवेशना दरम्यान गोंधळ घालणाऱ्या खासदारांचे निलंबन (MPs Suspended) केले गेले आहे. गेल्या चार दिवसात 92 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर काल (दि. 19 डिसेंबरला) आणखी 49 खासदारांचे निलंबन करण्यात आले. यात महाराष्ट्रीत खासदार सुप्रिया सुळे (Supria Sule) आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा समावेश आहे. त्याचे पडसाद विधिमंडळातही पडले. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या रिबिन लावत विरोधक आक्रमक झाले होते.

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या रिबीन लावत विरोधक आक्रमक

संसदेत खासदारांचे ज्या पद्धतीने निलंबन करण्यात आले. त्या विरोधात विधी मंडळाच्या पायऱ्यांवर काळ्या रिबीन लावून विरोधकांनी आंदोलन केले. नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांनी संसदेत खासदारांचे झालेले निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी, मराठा समाज, ओबीसी समाज जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याने विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळ्या रीबिन बांधून निषेध आंदोलन केले.

विजय वडेट्टीवारांची टीका

आमच्या सरकारने शेतकऱ्यांना कोरोनाकाळात तारले होते. मात्र, विद्यमान सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वड्डेटीवार यांनी केली. ते म्हणाले, संसदेत खासदारांचे निलंबन, हिवाळी अधिवेशनात शेतकरी , मराठा समाज ,ओबीसी समाज यांच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर दिले नाही. राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती भयावह आहे. सरकारने शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या सर्व योजना या फसव्या आहेत. हिवाळी अधिवेशनाकडे राज्यातील शेतकरी, सर्व सामन्याचे डोळे लागले होते, मात्र, या सरकारने सामान्य जनतेची , शेतकऱ्यांची घोर निराशा केली आहे अशी खरमरीत टीका करत वड्डेटीवार यांनी केली.

काशी-ज्ञानवापी: संघाचा शब्द पण, न्यायालयीन लढाईतून 2024 मध्ये मिळणार टॉनिक !

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून सरकार विरोधात निषेध आंदोलन केले. याप्रसंगी सर्व विरोधी पक्षातील नेते उपस्थित होते. तसेच विधिमंडळ परिसरात विरोधक विविध प्रश्नावर आक्रमक झाले. त्यांनी परिसरात मोर्चा काढत “कापूस सोयाबीन भाव दिला का ? नाही, नाही, नाही. भाताला भाव मिळाला का?नाही, नाही, नाही, धानाला भाव मिळाला का? नाही, नाही, नाही असं म्हणत सरकारवर टीका केली.

MP Suspension : मोदी सरकारच्या काळात निलंबनाचा ‘सुकाळ’; 10 वर्षांत 255 खासदार निलंबित

तर सगळ्या घटकावर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मराठा समाजाला फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो म्हणत सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार निदर्शने केले.हाताला काळी फीत बांधून, हातात घोषणांचे फलक घेत जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी परिसर दणाणून सोडला.

Tags

follow us

वेब स्टोरीज