MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी कारवाई; अप्पर सचिवासह 6 जण अटकेत, 2 सप्टेंबरपर्यंत सर्वांना पोलीस कोठडी

MPSC Drug Inspector Paper Leak औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी अप्पर सचिवासह सहा जणांना अटक; न्यायालयाने 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

MPSC Drug Inspector Paper Leak

MPSC Drug Inspector Paper Leak

MPSC Drug Inspector Paper Leak: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या भरती प्रक्रियेत कथित पेपरफुटी झाल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात MPSCच्या अप्पर सचिवासह आयोगातील दोन सहायक कक्ष अधिकारी, एका परीक्षार्थीसह तिचे वडील आणि कथित सूत्रधार अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये MPSCचे अप्पर सचिव अभिजीत लेंडवे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे आणि विश्वेश्वर नकाते, परीक्षार्थी ऋतुजा पाटील, तिचे वडील अमृत पाटील तसेच कथित पेपरफुटी सूत्रधार प्रवीण पाटील यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना 2 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रियकरासाठी MPSC चा पेपर फोडला, पण फटका बसला अनेकांना; परीक्षेतील धक्कादायक प्रकार उघड

या सहा जणांच्या चौकशीतून प्रश्नपत्रिका बाहेर जाण्यामागील नेमकी पद्धत, त्यासाठी झालेला कथित आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची माहिती मिळण्याची शक्यता आहे.

पेपरफुटीचा आरोप करणारा गौरव पाटीलही तपासाच्या रडारवर

दरम्यान, पेपरफुटीचा आरोप करणाऱ्या गौरव पाटीलची भूमिकाही तपास यंत्रणांकडून तपासली जात आहे. त्याची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, सध्या त्याला अटक झालेली नाही. त्यामुळे त्याचा या प्रकरणाशी नेमका संबंध काय आणि त्याच्याकडे पेपरफुटीबाबत कोणती माहिती होती, याचा तपास केला जात आहे.

22 मार्च रोजी झाली होती चाळणी परीक्षा

अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, गट-ब पदांच्या भरतीसाठी MPSCने परीक्षा घेतली होती. यातील चाळणी परीक्षा 22 मार्च 2026 रोजी राज्यातील सहा विभागीय मुख्यालयांवर ऑफलाइन पद्धतीने पार पडली.

साखरेच्या दरवाढीने ग्राहकांना झटका! D-Mart सह क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आता 5 किलोच साखर मिळणार

परीक्षेचा निकाल 12 जून रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर 506 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. यापैकी 488 उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 22 जुलैदरम्यान घेण्यात आल्या.

मुलाखती पूर्ण झाल्यानंतर 22 जुलै रोजी आयोगाने तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली. यात 485 उमेदवार पात्र, तर तीन उमेदवार अपात्र ठरले होते.

पेपरफुटी समोर आल्यानंतर संपूर्ण भरती रद्द

गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर परीक्षेतील गैरप्रकाराची माहिती समोर आली. त्यानंतर आयोगाने औषध निरीक्षक पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

पावसाच्या तुटीचा मराठवाड्याच्या शेतीला फटका; 3.5 लाख हेक्टर क्षेत्र घटलं, वाचा चिंताजनक आकडेवारी

या फेरपरीक्षेसाठी आधी अर्ज केलेल्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. त्यांच्याकडून कोणतेही परीक्षा शुल्कही घेतले जाणार नाही. फेरपरीक्षेची तारीख आणि अन्य माहिती आयोगाकडून स्वतंत्र प्रसिद्धीपत्रकातून जाहीर केली जाणार आहे.

40 लाखांच्या व्यवहाराचा आरोप

पेपरफुटी प्रकरणात मोठ्या रकमेची देवाणघेवाण झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. आमदार रोहित पवार यांनी औषध निरीक्षक पदाची प्रश्नपत्रिका 40 लाख रुपयांना विकली गेल्याचा आरोप केला होता.

त्यामुळे हा प्रकार काही व्यक्तींपुरता मर्यादित आहे की त्यामागे मोठे नेटवर्क कार्यरत आहे, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कोणत्या मार्गाने संबंधित उमेदवारापर्यंत पोहोचली आणि त्यासाठी पैशांचा व्यवहार झाला का, याचीही चौकशी सुरू आहे.

प्रेमसंबंधाचा अँगलही तपासात

या प्रकरणात प्रेमसंबंधातून एका उमेदवाराला फायदा मिळवून देण्यासाठी प्रश्नपत्रिका मिळवून देण्यात आल्याचा दावा समोर आला आहे. त्यामुळे या कथित पेपरफुटीला प्रेमप्रकरणाचा अँगल असल्याची चर्चा आहे.

अनाया बांगरचं क्रिकेटमध्ये पुनरागमन; या देशाने दिली खेळण्याची संधी पण BCCI चा नियम काय सांगतो?

मात्र, हा दावा तपासाचा एक भाग असून, त्यामागील सत्यता, संबंधित व्यक्तींची भूमिका आणि कथित आर्थिक व्यवहार याबाबत तपास पूर्ण झाल्यानंतरच अधिक स्पष्टता येणार आहे.

MPSC अधिकाऱ्यांच्या अटकेमुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले

भरती प्रक्रियेशी संबंधित आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यालाच अटक झाल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढल्याचे दिसून येत आहे. आयोगातील अधिकाऱ्यांसह बाहेरील व्यक्तींवर झालेल्या कारवाईमुळे प्रश्नपत्रिका लीक होण्याची संपूर्ण साखळी तपासण्याचे आव्हान गुन्हे शाखेसमोर आहे.

दरम्यान, भरती प्रक्रियेसाठी मोठ्या संख्येने उमेदवारांनी तयारी केली होती. प्रक्रिया रद्द झाल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण आहे. आगामी फेरपरीक्षा कोणत्याही गैरप्रकाराला वाव न देता पारदर्शक पद्धतीने घेण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे.

मुंबईच्या आमदारांच्या कामगिरीत सत्ताधारी पिछाडीवर; टॉप 5 मध्ये एकही सत्ताधारी आमदार नाही

आता पोलीस कोठडीदरम्यान आरोपींकडून काय माहिती मिळते, कथित 40 लाखांचा व्यवहार खरोखर झाला होता का आणि या प्रकरणात आणखी कोणाची नावे समोर येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

Exit mobile version