Download App

MPSC Exam मुलांमध्ये प्रमोद चौगुले तर मुलींमध्ये सोनाली मात्रे राज्यात प्रथम!

  • Written By: Last Updated:

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्यसेवा २०२१ च्या अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये सांगली जिल्ह्यातील प्रमोद चौगुले (Pramod Chaugule) यांनी राज्यात सलग दुसऱ्यांदा पहिला क्रमांक पटकावला आहे. तर शुभम पाटील याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळवला. तसेच आयोगाने संवर्गाच्या पसंतीक्रम सादर करण्यासाठी ३ मार्च १० मार्च २०२३ दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याआधारे अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने एकूण ४०५ पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. गेल्या वर्षी ७,८ आणि ९ मे २०२२ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात आला. प्रमोद चौगुले हे २०२० च्या परीक्षेतही राज्यात प्रथम आले होते. त्यावेळी त्यांची निवड जिल्हा उद्योग अधिकारी या पदी झाली होती. आयोगाने हा निकाल संकेतस्थळावर जाहीर केला आहे.

सांगलीच्या प्रमोद चौगुले यांनी ६३३ गुणांसह राज्यात पहिला क्रमांक पटकावला, तर शुभम पाटील यांना ६१६ गुण मिळाले असून त्यांचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. तर मुलींमध्ये राज्यात सोनाली मात्रे पहिल्या आल्या आहेत, तर सर्वसाधारण गुणवत्ता यादीत सोनाली यांना तिसरा क्रमांक मिळाला आहे.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधिक्षक, तहसीलदार सह एकूण २० पदांच्या ४०५ जागांसाठी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. या निकालाची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

Tags

follow us