MPSC चा मोठा निर्णय! राज्य सेवा मुख्य परीक्षेत 2027 पासून वैकल्पिक विषय नसणार

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

MPSC

साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेला मुहूर्त लागेना

MPSC No optional subjects in State Services Main Examination from 2027 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता एमपीएससीच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये 2017 पासून वैकल्पिक विषय पूर्णपणे वगळण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय एमपीएससीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.

आता सगळं उघड होणार ! ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित.. अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत

या निर्णयामुळे आता उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे दोन पेपर द्यावे लागणार नाहीत. या निर्णयानंतर आता सर्व उमेदवारांचा मूल्यमापन अधिक समान आणि प्रामाणिक पद्धतीने व्हावं यासाठी हा बदल करण्यात आल्याचं या प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आला आहे.

गौतमी पाटीलचा ‘लागला ठसका 440चा झटका… ‘लाईव्ह’मध्ये लावणीचा तडका असलेले नव्या धाटणीचे आधुनिक आयटम गीत

तर आत्तापर्यंत उमेदवारांना वैकल्पिक विषयाचे प्रत्येकी 250 गुणांचे दोन पेपर देणे अनिवार्य होतं. मात्र देशातील तामिळनाडू, तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार यासारख्या अनेक राज्यांच्या आयोगांनी मुख्य परीक्षांमधून वैकल्पिक विषय वगळले होते आणि आता याच धरतीवर एमपीएससी ने देखील हा निर्णय घेतला आहे.

कशी असेल आता परीक्षा?

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2017 पासून लागू होणाऱ्या सुधारित परीक्षा पद्धतीमध्ये एकूण सात पेपर अनिवार्य असतील यामध्ये भाषा पेपर एक मराठी व भाषा पेपर 2 इंग्रजी हे प्रत्येकी 300 गुणाचे पेपर असतील. त्यामध्ये 25% गुणांसह पात्रता मिळवणे आवश्यक असेल.

निबंध मराठी किंवा इंग्रजी 250 गुण- सामान्य अध्ययन म्हणजेच जी एस एक ते जीएस चार प्रत्येकी 250 गुणांचे चार पेपर एकूण 1000 गुणांसाठी असतील.

MPSC

तर या वैकल्पिक विषय वगळल्यामुळे त्याचे पाचशे गुण पूर्णपणे वजा झाले आहेत त्यामुळे मुख्य परीक्षेचे एकूण गुण पेपर क्रमांक तीन ते सात आता 1750 गुणांवरून बाराशे 50 वर आले आहेत तर मुलाखतीचे 275 गुण तसेच राहतील. त्यामुळे आता एमपीएससीची एकूण गुण संख्या 2025 वरून 1525 वर आली आहे.

Exit mobile version