Download App

MPSC : सदस्यपदी डॉ. सतीश देशपांडे, डॉ. अभय वाघ

  • Written By: Last Updated:

मुंबई : डॉ. सतीश माधवराव देशपांडे व डॉ. अभय एकनाथ वाघ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्यपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे ही नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीची अधिसूचना साेमवारी (दि. २३) राेजी राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात आली आहे.

राज्याच्या सामान्य विभागाचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी काढलेल्या राजपत्राद्वारे ही नियुक्ती कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण हाेईपर्यंत यापैकी जे आगाेदर पूर्ण हाेईल त्या कालावधीसाठी राहील.

 

Tags

follow us