MPSC : ७५ हजार नोकरभरतीचे काय झाले?

पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारमार्फत नोकर पदभरतीबाबत वारंवार शासन निर्णय काढले जात आहेत. प्रत्यक्षात पोलीस भरती सोडली तर कोणतीही गट-क/ड सरळसेवा जाहिरात आलेली नाही. जिल्हा परिषद भरती होत असलेला सावळा गोंधळ ठरवून केला जातोय की त्या तांत्रिक (Technical) अडचणी खरोखरच आहेत याबद्दल शंका आहे. आरोग्य भरती फेरपरीक्षेबाबत आरोग्य मंत्री जास्त उत्सुक दिसले नाही, तर […]

MPSC Logo

MPSC Logo

पुणे : राज्यातील शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanvis) सरकारमार्फत नोकर पदभरतीबाबत वारंवार शासन निर्णय काढले जात आहेत. प्रत्यक्षात पोलीस भरती सोडली तर कोणतीही गट-क/ड सरळसेवा जाहिरात आलेली नाही. जिल्हा परिषद भरती होत असलेला सावळा गोंधळ ठरवून केला जातोय की त्या तांत्रिक (Technical) अडचणी खरोखरच आहेत याबद्दल शंका आहे. आरोग्य भरती फेरपरीक्षेबाबत आरोग्य मंत्री जास्त उत्सुक दिसले नाही, तर तलाठी, शिक्षक, वन विभाग, नगरपरिषद अशा अनेक नोकर भरतींबाबत घोषणा देण्यात येत आहेत. पण एकही जाहिरात प्रत्यक्षात आलेली नाही. त्यामुळे आम्हाला #७५०००_मेगाभरती_सुरू_करा हा हॅश टॅग वापरत मेगा ‘ट्विटर वॉर’  (Twiter Waar) करावा लागत आहे, असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या विद्यार्थ्यांनी सांगितले.गेल्या चार वर्षांपासून जाहिरात येऊनही जिल्हा परिषद पदभरती, आरोग्य विभाग फेरपरीक्षा, शिक्षक पदभरती (TAIT), तलाठी पदभरती, नगरविकास विभाग पदभरती, वन विभाग पदभरती, पशुसंवर्धन पदभरती तसेच एमआयडीसी पदभरती आदी परीक्षा रखडल्या आहेत.देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केलेली २०१९ ची ७२,००० पदांची मेगाभरती पूर्ण होऊ शकलेली नाही. आता ते ७५,००० ची घोषणा घेऊन परत मार्केटमध्ये आले आहेत. राज्य सरकारकडून नोकरभरतीबाबत नियोजनशून्य कारभार सुरू आहे. नोकर भरती करायचीच नाही म्हणून असे सगळे कारणे देण्यात येत आहेत का? याची आम्हाला शंका आहे. एका महिन्याच्या आत ७५,००० मेगा भरतीच्या सर्व जाहिराती प्रसिद्ध करण्यात येऊन पुढील पाच-सहा महिन्यात ७५,००० पदांची नियुक्तीपत्रे फडणवीसांनी वाटली नाही तर ही मेगाभरती सुद्धा फसवीच असेल असा निष्कर्ष आपल्याला काढता येईल.आम्ही सुचविलेल्या सर्व बाबी अंमलात आणत जिल्हा परिषदा, आरोग्य, तलाठी, शिक्षक आणि इतर सर्व सरळसेवा जाहिराती तत्काळ प्रसिद्ध करण्यात याव्या यासाठी आम्ही #७५०००_मेगाभरती_सुरू_करा हा हॅश टॅग वापरत मेगा  ‘ट्विटर वॉर’ करत आहोत. त्यामुळे याची तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा मागण्या मान्य न झाल्यास येत्या काही दिवसांत आम्ही राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात करणार असल्याचा इशारा स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने दिला आहे. या ‘ट्विटर वॉर’ला राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे समन्वय समितीच्या वतीने सांगण्यात आले.
https://www.youtube.com/watch?v=oHQK4O7cmTA
Exit mobile version