Mukesh Ambanis Friend Prakash Shah Left Reliance Became Sanyasi : रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे जवळचे सहकारी प्रकाश शाह यांनी (Prakash Shah) संन्यासी जीवन स्वीकारले आहे. 75 कोटी रुपये पगाराची नोकरी सोडत (Reliance) त्यांनी सांसारिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये उपाध्यक्ष पदावर होते . प्रकाश शाह हे मुकेश अंबानी यांचे उजवे हात मानले जात होते.
प्रकाश शाह यांनी वयाच्या 63 व्या वर्षी संन्यास घेतला आहे. प्रकाश शाह आणि त्यांच्या पत्नी नैना शाह यांनी महावीर जयंतीनिमित्त दीक्षा घेतली. त्यांना खूप आधीपासून दीक्षा घ्यायची होती, परंतु कोरोना साथीमुळे काही काळासाठी ती पुढे ढकलण्यात आली. दीक्षा ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये व्यक्ती साधे जीवन जगते. त्याच वेळी, तो मोक्ष मिळविण्यासाठी सत्कर्म करतो.
‘पुनीत बालन ग्रुप’कडून आषाढी वारीतील 8 हजार पोलिसांना जीवनावश्यक वस्तूंचे किट
आयआयटीमधून शिक्षण
प्रकाश शहा यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून पदव्युत्तर शिक्षणही घेतले आहे. त्यांची पत्नी वाणिज्य शाखेची पदवीधर आहे. त्यांना दोन मुले आहेत. त्यांच्या एका मुलाने काही वर्षांपूर्वी दीक्षा घेतली. त्यांचा दुसरा मुलगा विवाहित आहे आणि त्याला एक मूलही आहे.
धक्कादायक! मुंबईत नातवाने आजीला फेकले कचऱ्यात; खळबळजनक कारण आलं समोर
रिलायन्सचे अनेक प्रकल्प हाताळले
रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये काम करत असताना, प्रकाश शाह यांनी कंपनीचे अनेक मोठे प्रकल्प यशस्वीरित्या हाताळले. त्यांनी जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्ट आणि पेटकोक मार्केटिंग सारख्या मोठ्या प्रकल्पांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. संपूर्ण जबाबदारी घेतली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाह यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना वार्षिक 75 कोटी रुपये पगार मिळत होता.
त्यांनी भौतिक सुखसोयींचा त्याग केला आहे. आध्यात्मिक शांती आणि मोक्षाचा मार्ग निवडला आहे. साधू म्हणून, ते आता अनवाणी चालणार आहे. साधे पांढरे कपडे घालत भिक्षेवर जगणार आहे. शाह आता 64 वर्षांचे आहेत. त्यांचा दीक्षा समारंभ संपूर्णपणे मुंबईतील बोरिवली येथे झाला.