Download App

मुंबई-अमरावती रेल्वेचा मोठा अपघात; ट्रकने जोरदार धडक दिल्याने घडली घटना

घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली असून, रेल्वे मार्ग लवकरच सुरळीत करण्याचं प्रयत्न सुरू आहेत.

  • Written By: Last Updated:

Mumbai-Amravati Express Accident : मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या रेल्वेला एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात घडला. हा अपघात रेल्वे फाटकाजवळ झाला असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. (Express ) अपघातानंतर रेल्वे आणि स्थानिक प्रशासनाने तत्काळ मदतकार्य सुरू केलं आहे. घटनास्थळी पोलीस आणि आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आली असून, रेल्वे मार्ग लवकरच सुरळीत करण्याचं प्रयत्न सुरू आहेत.

इंडिया मास्टर्सचा शानदार विजय, सचिन  युवराज चमकले, ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये 94 धावांनी पराभव

बोदवड नाढगावजवळ रेल्वे गेट तोडून एक धान्याने भरलेला एक ट्रक अडकून पडलेला होता. आज सकाळी 4.30 वाजताच्या सुमारास मुंबईहून अमरावतीकडे जाणाऱ्या अमरावती एक्सप्रेसची धडक या ट्रकला बसल्याने अपघात झाला. रेल्वे चालकाने दाखविलेल्या सूचकतेमुळे रेल्वेची गती अतिशय कमी होती. अपघात झाला असला तरी जीवितहानी मात्र झाली नसल्याची सध्या माहिती आहे.

अपघात झालेला ट्रक रेल्वेत अडकून पडला असल्यानं त्याला काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. बोदवडजवळ झालेल्या ट्रक आणि अमरावती एक्सप्रेसच्या अपघातामुळे नागपूर भुसावळ रेल्वे वाहतूक दोन्ही बाजूने ठप्प झाल्या आहेत. नेक प्रवासी गाड्या मलकापूर ,नांदुरा, शेगाव, अकोला स्थानकात अडकल्या. सणासुदीच्या दिवशी रेल्वे प्रवाशांचे हाल झाले आहे.

follow us

संबंधित बातम्या