उद्योजक अविनाश भोसलेंना न्यायालयाचा दणका! जामीन अर्ज फेटाळला…

येस बॅंकेच्या फसवणुकीप्रकरणी पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक(उद्योजक) अविनाश भोसले यांना मुंबई विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने गुन्हेगारी कट रचून बॅंकेची फसवणूक केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे. Kolhapur News : संरक्षक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू… विशेष न्यायाधीश एम.जी देशपांडे यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं. […]

Avinash Bhosle

Avinash Bhosle

येस बॅंकेच्या फसवणुकीप्रकरणी पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक(उद्योजक) अविनाश भोसले यांना मुंबई विशेष न्यायालयाने दणका दिला आहे. अविनाश भोसले यांचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. आरोपीने गुन्हेगारी कट रचून बॅंकेची फसवणूक केल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.

विशेष न्यायाधीश एम.जी देशपांडे यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं. यावेळी आपलं निरीक्षण नोंदवताना न्यायाधीश देशपांडे म्हणाले की, आर्थिक गुन्ह्याशी संबंधित प्रकरणांना कठोरपणे सामोरे जावे लागते. ही सद्यस्थिती आहे.

काँग्रेसमध्येही स्फोट होणार! शिवसेना, राष्ट्रवादीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं पुढचं टार्गेट

या गंभीर आर्थिक गुन्ह्यात अर्जदाराचा सहभाग असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून प्रकरणातील फसवणुकीची रक्कम फार मोठी म्हणजेच अंदाजे चार हजार कोटी रुपये इतकी आहे. दुसरीकडे, ज्या पद्धतीने ही आर्थीक फसवणूक झाली आहे, ती पाहता अर्जदाराला जामीन देणे योग्य ठरणार नसल्याचं न्यायालयाने नोंदवलं आहे.

काळीज पिळवटणारा व्हिडिओ! गरोदर महिलेचा आधी झोळी नंतर नदीतून ओंडक्याने प्रवास…

Kolhapur News : संरक्षक भिंत कोसळून एका महिलेचा मृत्यू…

पुराव्यांशी छेडछाड करून खटला बिघडवण्याची शक्यता असल्याचे नमूद करत न्यायालयाने भोसले यांचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच सुट्टीकालीन विशेष न्यायालयातही भोसलेंकडून तत्काळ जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता.

दरम्यान, हा अर्ज न्यायालयाने 19 मे 2023 रोजी फेटाळून लावला होता. त्याच आधारावर हा अर्ज केला असल्याने फेटाळण्यात येत असल्याचेही न्यायालयाकडून आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version