Vishakha Raut : सहा खासदारांनंतर ऑपरेशन टायगरअंतर्गत शिवसेना ठाकरे गटातील 14 आमदार देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असताना मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे नगरसेविका विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पालघरच्या जात पडताळणी समितीने कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मुंबई महापालिका निवडणुकीत विशाखा राऊत (Vishakha Raut) यांनी प्रभाग क्रमांक 191 मधून शिंदे गटाच्या माजी आमदार सदा सरवणकरांची कन्या प्रिया सरवणकर (Priya Sarvankar) यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. मात्र आता त्यांचा नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे.
नेमकं प्रकरण काय?
विशाखा राऊत यांचे ओबीसी प्रमाणपत्र हे अवैध असल्याचा निर्णय पालघरच्या जात पडताळणी समितीने दिला होता. तसेच विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचा निर्णय जाहीर करण्यात यावा असं पत्र मुंबई महापालिकेने राज्य सरकारला लिहिलं होतं मात्र महापालिकेच्या या पत्रव्यवहारावर आक्षेप घेत विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सगळ्यात चालबाज विखे पाटील… जरांगे पाटील भडकले-
या याचिकेवर आता मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देत याचिका रद्द केली आहे. तर दुसरीकडे उच्च न्यायालयाने विशाखा राऊत यांची याचिका रद्द केल्यानंतर आता विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर त्यला आव्हान देण्यासाठी 90 दिवसांचा अवधी आहे. जर राऊत यांचे नगरसेवक पद रज्ज झाले तर प्रिया सरवणकरांना नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे.
