Manoj Jarange on Vikhe Patil : सगळ्यात चालबाज विखे पाटील… जरांगे पाटील भडकले
Manoj Jarange On Vikhe Patil : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुन्हा एकादा 29 ऑगस्टपासून आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक
Manoj Jarange On Vikhe Patil : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा 29 ऑगस्टपासून आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस असून माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर तसेच मंत्री विखे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सध्या उंटावरून शेळ्या हाकण्याचं काम सुरु आहे. आम्ही सांगितलं सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी करा पण यांना आंदोलन मोडून काढायच आहे. सगळ्या मसुद्याची अंमलबजावणी पाहिजे आणि रद्द केलेले 4 प्रमाणपत्र वैध करून पाहिजे. विखे पाटील (Vikhe Patil) खूप चालबाज आहे. काम कमी करायचं दुसऱ्या जातींना डाग लावायचा असं काम सध्या सुरु आहे. नवरा मेला तरी चालेल पण सवत रंडकी झाली पाहिजे असं सुरू आहे. 58 लाख नोंदीचे आजपासून जात प्रमाणपत्र वाटप सुरु करा आणि सातारा, कोल्हापूर संस्थांचे जीआर काढा. हैद्राबाद गॅझेट नुसार प्रमाणपत्र वाटप सुरू करा अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
तसेच मसुदा वाचला का आणि मान्य आहे का? यावर देखील मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी ते म्हणाले की, मी वाचला नाही. तुम्ही माणसाची तब्येत खराब होण्याची वाट पहा. तुम्ही माणसं बेशुद्ध पडल्यानंतर येणार आणि वाचला का विचारणार किती नीच अवलादी आहेत.? तेच तेच का विचारता.? मराठे चवताळले तर तुम्हाला हाता खालून काढतील. मुंबईतही हेच होईल असं देखील मनोज जरांगे म्हणाले.
सरकार मराठ्यांना फसवणार आहे. हे मराठ्यांसह ओबीसींना फसवत आहे. आपण सगळे जातीचे मिळून यांना कुटून काढू हे सत्तेत राहिले तर अवघड होईल असेही यावेळी जरांगे म्हणाले.
केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच बदल, नितीन गडकरींना मोठा धक्का; खातं जाणार?
तर दुसरीकडे या पत्रकार परिषदेत बोलताना जरांगे पाटील यांनी मंत्री विखे पाटलांवर देखील निशाणा साधला. तिथे बसून भजे कुरडया खातात. तुम्ही किती नीच आहात रे. आमच्या जातीचे असूनही तुम्ही नीच आहात.आपण कुणालाही हात लावायचा नाही. यांना फक्त हात लावू द्या. यांच्या डोक्यात दंगल घडवायची असेल तर मी उपोषण सोडून देईन आणि टप्पू गोटे घेऊन व्यासपीठावर बसेल. तुम्हाला जेवढी मजा घ्यायची तेवढी घ्या,आता वारंवार काय सांगायचं. तुम्ही चुकीचे जीआर आणा,काही चुकलं तर सुधारीत जीआर काढा. तुम्ही कॅम्प लावला तर काढा ना मग गावा गावात प्रमाणपत्र वाटप सुरू करा. तुम्ही जीआर काढा, चुकला तर अभ्यासकांना विचारून सुधारित काढा असेही जरांगे म्हणाले.