Ajit Pawar on Maharashtra Elections : राज्याला विधानसभा निवडणुकांचे वेध लागले (Maharashtra Elections) आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच सुरू झाली आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत महायुतीत जास्त (Mahayuti) चढाओढ दिसून येत आहे. अजून जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. मात्र त्याआधीच अजितदादांनी दबावाचं (Ajit Pawar) राजकारण सुरू केलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Elections) कामगिरी पाहता त्यांना किती जागा मिळतील याची शाश्वती नाही. मात्र अजित पवारांनी आधीच किती जागा पाहिजे आहेत याचा आकडाच सांगून टाकला आहे.
आपल्याकडे असणाऱ्या 54 जागांवर आपण लढणारच आहोत पण एकूण 60 जागांवर आपल्याला काम करायचं आहे असे अजित पवार म्हणाले. मुंबईत काल (Mumbai News) संध्याकाळी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अजित पवारांनी महायुतीला अनपेक्षित असे वक्तव्य केले. याबरोबरच आणखी काही आमदार आपल्या संपर्कात असून ते लवरकरच पक्षात प्रवेश करतील असे अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar: आता ‘ही’ चूक पुन्हा होणार नाही; लोकसभेला कंबर मोडली, अजित पवारांची जाहीर माफी
मुंबईतील वांद्र पूर्व विधानसभा मतदारसंघाचे (Elections 2024) आमदार झिशान सिद्दीकी, नाशिकच्या इगतपुरी मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर, अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके असे आमदार आपल्यासोबत आहेत असे अजित पवार म्हणाले. या आमदारांचा लवकरच पक्षात प्रवेश होईल असं संकेत अजित पवार यांनी या बैठकीत दिला. आता यातील किती जण प्रत्यक्षात प्रवेश करतील याचं उत्तर थोड्याच दिवसांत मिळेल.
दरम्यान, आता अजित पवार यांनी थेट आकडाच जाहीर केल्याने महायुतीत अस्वस्थता निर्माण होणे सहाजिकच आहे. महायुतीत अद्याप जागावाटपाच्या चर्चा सुरू झालेल्या नाहीत. निवडणुकीला अजून दोन महिन्यांचा काळ बाकी आहे. त्यामुळे इतक्यात चर्चा सुरू होतील याची शक्यता कमीच आहे. तरीदेखील घटक पक्षांकडून दबावाचं राजकारण केलं जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडूनही 100 ते 110 जागांची मागणी होत आहे. त्यामुळे भाजपाची मोठी कोंडी होताना दिसत आहे. यामध्ये कुणाला किती जागा मिळणार याचं गणित अजून ठरलेलं नाही. आगामी काळात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.