Ajit Pawar : शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? अजितदादांनी दिलं ‘हे’ उत्तर
Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) हे महायुतीबरोबर सत्तेत सहभागी झाले. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाचा पराभव झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) तोंडावर अजित पवार हे शरद पवार गटात जाणार का? याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलं.
संजय राऊत प्रगल्भ नेते नाहीत, तोल गेल्याने ते काहीही बरळतात; वंचितचा हल्लाबोल
अजित पवार यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं.
अजित पवार म्हणाले, नो कॉमेंट्स… मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काय काम केलं, कोणत्या मतदारसंघात काय केलं, याची माहिती लोकांना देत आहोत. लोकसभा निडणुकीत आमच्याकडून जे काही बाकी राहिलं. त्यामुळं मतदार आमच्यासोबत आला नाही. त्यांना समजावत आहोत, असं अजित पवार म्हणाले.
अमित देशमुखांना ‘देवघरातूनच’ आव्हान? अर्चना पाटील चाकूरकर टफ ठरणार?
संविधानाबाबत फेक नॅरेटीव्ह समोर आणण्यात आलं होतं. त्याचा फटका बसला. चारशे पारचा नारा दिल्यानं हे संविधान बदलणार असं सांगितल्या गेलं. पण, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या घटनेला हात लावला जाणार नाही.
बारामतीत जे घडलं त्याला मीच जबाबदार…
यावेळी अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांना बारामतीची निवडणूक लढवण्यास सांगणं ही चुक होती, या वक्तव्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, माझ्या मनात जे येतं, ते मी बोलतो. मी 35 वर्षांपासून राजकारणात आहे. मला कुणीतरी विचारलं. मी निवडणुकीनंतर खूप विचार केला. हे कसं घडले? का घडलं? त्याला मीच जबाबदार आहे. मी कोणाला दोष देत नाही. मी हे करायला नको होते, म्हणूनच मी बोललो, असे अजित पवार म्हणाले.
बारामतीत मी घेतलेला निर्णय कुटुंबासाठी चुकीचा होता. कुटुंबे एकमेकांच्या विरोधात उभी राहिली की कोणाचा तरी पराभव निश्चित होता. विजेते आणि पराभूत हे एकाच कुटुंबातील आहेत. निवडणुकीच्या काळात या निर्णयामुळे कुटुंबातील इतरांचे हाल होत होते. म्हणून मी म्हणालो, असं म्हणालो.