नवाब मलिकांची अजित पवारांना साथ? एक्सवर पोस्ट करत दिले संकेत

नवाब मलिकांची अजित पवारांना साथ? एक्सवर पोस्ट करत दिले संकेत

Nawab Malik : दीड वर्ष तुरुंगास भोगून जामीनावर बाहेर आलेल्या राष्ट्रवादी आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांनी अखेर आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. मलिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. एक्स अकाऊंटवर स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर करत मलिकांनी उघड भूमिका घेतली.

शरद पवारांनी आदेश दिला तर पाकिस्तानातूनही निवडणूक लढवेन, सूर्यकांता पाटील विधानसभेच्या रिंगणात 

 

नवाब मलिक यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. आपणा सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शभेच्छा अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली. या पोस्टसोबत जोडलेल्या फोटोत नवाब मलिक, आमदार, अणूशक्ती नगर असा उल्लेख करतांना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत निवडणूक चिन्ह घड्याळ लावले आहे. मलिकांनी घड्याळ हे चिन्ह वारपल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतांना शेअर केलेल्या पोस्टमध्येही मलिक यांनी घड्याळ वापरले होते.

लोकसभेला हिसका दाखवल्याने सरकार हादरलं; जयंत पाटलांनी जखमेवर मीठ चोळलं 

मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, मलिक हे जामीनावर सुटून आल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करणे योग्य होणार नाही, असे म्हटले होते. तेव्हापासून राष्ट्रवादीने मलिक यांना दूरच ठेवलं होतं. मात्र, मलिक यांनी आता स्वातंत्र्यदिनाच्या पोस्टमध्ये घड्याळाचे चिन्ह वापरलं. त्यामुळे ते अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र. मलिक यांच्यावर आरोप करणारे देवेंद्र फडणवीस यांना मलिक यांचा महायुतीतील सहभाग चालणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर मुंबईतील अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते पाचव्यांदा आमदार झाले आहेत. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube