नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! पुन्हा जेलवारी होणार?, मोहित कंबोज यांचा इशारा

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ! पुन्हा जेलवारी होणार?, मोहित कंबोज यांचा इशारा

Mohit Kamboj on Nawab Malik : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना काही महिन्यांपूर्वी जामीन मिळाला होता. कोर्टाने मलिक यांना केवळ नाजूक प्रकृती असल्याने वैद्यकीय उपचारांसाठी जामीन मंजूर केला होता. सध्या मलिक बाहेर आहेत. दरम्यान, आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी मलिक यांची पुन्हा जेलध्ये वापसी होणार असल्याचा इशारा दिला.

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन? ‘मी असं बोललोच नाही’; शरद पवारांचा घुमजाव… 

मोहित कंबोज यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली. त्यात त्यांनी लिहिलं की, कुर्लाच्या मियॉं सलीमला सांगू इच्छितो की, जुनमध्ये पाऊस होणार नाही, पण तुमची वापसी नक्की होणार, अशी पोस्ट कंबोज यांनी केली. हे ट्वीट कंबोज यांनी मलिकांना देखील टॅग केलंय.

नवाब मलिक यांना जामीन मिळाल्यानंतर ते विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले होते. मलिक शरद पवार गटासोबत विरोधी बाकावर बसमार की, सत्ताधारी बाकावर बसणार असे तर्क-वितर्क लढवले जात असतांना मलिकांनी सत्ताधारी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यावेळी फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहित आपली भूमिका माडंली होती. मलिकांवर ज्या पद्धतीचे आरोप आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली होती.

PHOTO: झरीन खान ते ईशा गुप्ता ‘या’ अभिनेत्रीचा खास अंदाज; पाहा नवे फोटो! 

मलिकांवर आरोप काय?
नवाब मलिक यांना ईडीने 23 फेब्रुवारी 2022 रोजी गोवावाला कंपाऊंडमधील मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. जवळपास दीड वर्ष ते तुरूंगात होते. त्यानंतर ऑगस्ट २०२३ मध्ये त्यांना सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय कारणासाठी अटी-शर्थींसह जामीन दिला होता.

दरम्यान, जामीन मिळाल्यानंतर मलिक यांनी अजित पवार गटासोबत जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यांना महायुतीत घेण्याला भाजपने विरोध केला होता. आता कंबोज यांनी जेलमध्ये वापसी होणार असा, सूचक इशारा दिला. त्यामुळं मलिकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज