Nawab Malik : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधातील तक्रार मागे घेण्यासाठी मोहित कंबोज (Mohit kamboj) यांनी न्यायालयाला विनंती केली. तशी बातमी छापून आली. या प्रकाराची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरू झाल्यानंतर मोहित कंबोज यांनीच खुलासा केला आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका,वृत्तपत्रातील बातमी पूर्णपणे खोटी आहे. मी नवाब मलिक यांच्या विरोधातील मानहानीची केस मागे घेतलेली नाही. माझी लढाई सुरुच राहणार आहे, असे मोहित कंबोज यांनी सांगितले.
मी नवाब मलिक यांच्याविरोधातील केस मागे घेतल्या अशी बातमी एका वृत्तपत्राने दिली. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे. मी कोणतीच केस मागे घेतलेली नाही. माझी लढाई सुरुच राहणार आहे. मी जो मानहानीचा खटला दाखल केला होता त्याची आजही तारीख पडत आहे. त्यांना त्यावर उत्तर द्यावेच लागेल. पण, खोट्या बातम्या प्रसारित करू नका अशी माझी माध्यमांनाही विनंती आहे, असे कंबोज यांनी सांगितले.
‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने अस्वस्थता; फडणवीस, सांभाळा! सामनातून टीकेचे बाण
मनी लाँड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले नवाब मलिक यांना मागील आठवड्यात जामीन मिळाला. त्यानंतर त्यांच्याविरोधातील केस मागे घेतल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र कंबोज यांनी या चर्चा स्पष्ट शब्दांत फेटाळून लावल्या.
नवाब मलिक यांनी आर्यन खान प्रकरणानंतर मोहित कंबोज यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर कंबोज यांनी कोर्टात मलिक यांच्याविरुद्ध मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी मलिक कोर्टात आले. त्यावेळी मलिक यांच्या समर्थकांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. यामध्ये कोविडच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप कंबोज यांनी केला होता. तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा पोलिसांनी काहीच दखल घेतली नाही, असेही कंबोज म्हणाले होते.
मेन खुर्चीपासून सुरूवात होणार; वडेट्टीवारांच्या दाव्याने पुन्हा टेन्शन वाढलं