मेन खुर्चीपासून सुरूवात होणार; वडेट्टीवारांच्या दाव्याने पुन्हा टेन्शन वाढलं

  • Written By: Published:
मेन खुर्चीपासून सुरूवात होणार; वडेट्टीवारांच्या दाव्याने पुन्हा टेन्शन वाढलं

मुंबई : आतापर्यंत राज्यातील अनेक नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पदाबाबत भाकित वर्तवले आहे. परंतु, अद्यापपर्यंत शिंदेंच्या पदावर कोणताही बदल झालेला नाही. मात्र, आता विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी शिंदेंबाबत केलेल्या दाव्यामुळे शिंदेंचे टेन्शन पुन्हा वाढलं आहे. सप्टेंबर महिन्यापासून मुख्य खुर्चीपासून राज्या बदलाला सुरूवात होईल असे वडेट्टीवर यांनी म्हटले आहे. राज्यात सत्ताबदल होणार असल्याचे मी ठासून सांगतो असे म्हणत शिंदे सप्टेंबर महिन्यात पदावरून पायउतार होतील. (Vijay Wadettiwar Attack On CM Shinde Chair )

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने अस्वस्थता; फडणवीस, सांभाळा! सामनातून टीकेचे बाण

कार्यक्रमाच्या उपस्थितीवरून हल्लाबोल

यावेळी वडेट्टीवारांनी शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या शासकीय कार्यक्रमांच्या उपस्थितीवरून हल्लाबोल केला. ते म्हणाले की, एखाद्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री असतात तेव्हा दोन पैकी एक उपमुख्यमंत्री नसतो. तर, कधी दोन उपमुख्यमंत्री असतात तेव्हा मुख्यमंत्री नसतात. शिंदेंनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अजितदादांनी दांडी मारली यावरूनचं सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही हे स्पष्ट होत आहे. सत्तेच्या हव्यासापोटी राज्यात काहीही सुरू आहे.

शरद पवारांच्या फोटोचं ‘पॉलिटिक्स’ जोरात; भुजबळांना आठवले पवारांचे ‘ते’ जुने शब्द

फडणवीस, अजितदादांकडून शिंदेंना बळ

दुसरीकडे मुख्यमंत्री पदाबाबत होणाऱ्या चर्चांमध्ये शिंदेंचे टेन्शन वाढत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना बळ दिले आहे. शिर्डी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना फडणवीस म्हणाले की, “काही लोक सांगतात की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. हो, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, पण ती कशा करता? तर त्या खुर्चीच रक्षण करण्याकरता आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिलं तरी आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून त्याला त्याची जागा दाखवून देण्याचं काम करु” असे फडणवीस म्हणाले होते.

‘महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिगाडा काम बिगाडा’; काँग्रेस नेत्याचं भन्नाट ट्विट

बावनकुळेंचं उत्तर 

वडेट्टीवीरांनी केलेल्या या दाव्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले की, राज्याचे विरोधीपक्ष नेते म्हणून काही गोष्टी बोलाव्या लागतात म्हणून ते बोलतात. पण राज्यात 200 च्या वर बहुमत असलेले सरकार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं हे आमचे नेते असून, तेच मुख्यमंत्री आहेत आणि तेच मुख्यमंत्री राहतील असे आमच्या वरिष्ठ नेतृत्त्वाने स्पष्ट केले आहे. विरोधकांनी असे कितीही स्वप्न पाहिले तरी ते साकार होणार नाहीत असा विश्वासह यावेळी बावनकुळेंनी बोलताना व्यक्त केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube